IMPIMP

Mumbai : भांडुपमधील रुग्णालयाच्या आगीची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी ! कारवाईचा इशारा देत म्हणाले…

by bali123
maharashtra cm uddhav thackeray bhandup hospital fire

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी भांडुपमधील ड्रीम्स मॉल सनराईज रुग्णालयात लागलेल्या आगीची दखल घेतली आहे. त्यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली आहे. ज्यांनी या दुर्घटनेत आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबीयांसाठी दिलगिरी व्यक्त केली. त्यांच्या कुटुंबीयांना मदत केली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं. कोरोना संकटामुळं मॉलला तात्पुरत्या स्वरूपात रुग्णालय सुरू करण्याची परवानगी दिली होती असं म्हणत त्यांनी यात दोषी असणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही दिला आहे. या आगीत 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

PM नरेंद्र मोदींच्या बांग्लादेशी दौर्‍यावर पाकिस्तानचा सवाल, बांग्लादेश वासियांनी दिले त्यांना चोख प्रत्युत्तर

‘तात्काळ आणि तात्पुरत्या पद्धतीनं उपचार व्हावे यासाठी रुग्णालयाची परवानगी दिली होती’
उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळीच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, काल रात्री आपण कोविडासाठी काही ठिकाणी तात्काळ आणि तात्पुरत्या पद्धतीनं उपचार व्हावे यासाठी रुग्णालयाची परवानगी दिली होती. त्यातलंच एक मॉलमध्ये तयार केलेलं हे रुग्णालय होतं. आपण राज्यभर जिथं शक्य असेल तिथं आवश्यकतेनुसार कोविड सेंटर आणि रुग्णालयांसाठी परवानगी दिली होती. त्याचप्रमाणे हे रुग्णालय सुरू होतं. ही तात्पुरती परवानगी होती आणि 31 तारखेलाच संपत होती.

‘दु्र्दैवानं हॉस्पिटलच्या खाली असलेल्या ठिकाणी आग लागली आणि पसरत वर गेली’
पुढं बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, दु्र्दैवानं हॉस्पिटलच्या खाली असलेल्या ठिकाणी आग लागली आणि पसरत वर गेली. तिथं जे कोरोना रुग्ण दाखल होते त्यांना सर्वांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला होता. परंतु काही जण हे व्हेंटीलेटरवर होते. त्यांना काढण्यास वेळ लागला. इतर रुग्णांची सुटका झाली. त्यांची सुटका करण्यात वेळ लागला आणि त्यांचा मृत्यू झाला.

Photos : श्वेता तिवारीनं ‘बोल्ड’ फोटो शेअर करत दाखवले ‘अ‍ॅब्ज’ ! चाहते म्हणाले – ‘वय जराही वाढलं नाहीये’

‘जर याच्यात कोणाचा दोष असेल तर कायद्यानुसार कारवाई केली जाईल’
उद्धव ठाकरे uddhav thackeray म्हणाले, अशा दुर्घटना झाल्यानंतर आपण सगळे जागे होतो आणि चौकशी सुरू होते. या बाबतीतही चौकशी केली जाईल. जर याच्यात कोणाचा दोष असेल तर कायद्यानुसार कारवाई केली जाईल. जिथं असे हॉस्पिटल्स, कोविड सेंटर्स आहेत त्यांचं फायर ऑडिट करा आणि अशा दुर्घटना होऊ देऊ नका अशा सूचना केल्या आहेत.

‘जिथं हॉस्पिटल आहेत तिथं इतर संपूर्ण आस्थापनांसह संपूर्ण इमारतीचं फायर ऑडिट करण्याच्या सूचना’
उद्धव ठाकरे uddhav thackeray असंही म्हणाले की, कोरोनाचं संकट वाढत असून काही स्वयंसेवी संस्था, डॉक्टर यांची मदत घेणं आवश्यक होतं. रुग्णालये असतील किंवा अशा मॉल्सला फायर ऑडिटच्या सूचना केल्या आहेत. जिथं हॉस्पिटल आहेत तिथं इतर संपूर्ण आस्थापनांसह संपूर्ण इमारतीचं फायर ऑडिट करणं गरजेचं आहे असंही ठाकरेंनी यावेळी बोलताना सांगितलं.

Also Read : 

रूपाली चाकणकरांचा परमबीर सिंहांवर निशाणा, म्हणाल्या – ‘नाव परमविरासारखं अन् संपत्ती हडपतो बकासुरासारखी’

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काल घेतली होती पत्रकार परिषद

देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा उद्रेक ! एकाच दिवसात 59 हजार नवीन कोरोना रुग्ण, 10 दिवसात झाले दुप्पट नवे रुग्ण

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वनाधिकारी महिलेची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वनाधिकारी महिलेची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या

 

BJP : महा’वसुली’ सरकारला फक्त सत्तेचीच चिंता

चंद्रकांत पाटलांनी केलं ReTweet ! म्हणाले – ‘अनिल देशमुखांकडून 21 तारखेलाच पत्र लिहून घेतलं गेलं अन्…’

मुख्यमंत्र्यांनंतर आता उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव, 9 जणांना बाधा

Related Posts