IMPIMP

मुख्यमंत्री ठाकरेंनी पोलिसांबाबत केलं महत्वपूर्ण विधान; म्हणाले, ‘…भानावर राहावेच लागेल’

by bali123
maharashtra cm uddhav thackeray nashik police academy convocation ceremony

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाईन – ‘शिस्त आणि देखणेपणाचा अनोखा संगम दीक्षांत समारंभात असतो. आज मात्र मास्क घालूनच हा कार्यक्रम करावा लागत आहे. पोलिस दलाचे हेच महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. शिस्त आणि नियमांचे पालन करत आहोत. आजच्या समारंभातून कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम अधिकारी महाराष्ट्राला देत आहोत’, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thackeray यांनी सांगितले. तसेच ‘जोश आणि होश यांचे तारतम्य बाळगावे लागेल. त्यासाठी भानावर राहावेच लागेल’, असेही ते म्हणाले.

‘संसाधने तसेच लस उपलब्ध आहे, मग लॉकडाऊन का ?’, मनसेचा Lockdown ला विरोध, ठाकरे सरकारवर साधला ‘निशाणा’

नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीतील उपनिरीक्षकांच्या 118 व्या सत्राचा दीक्षांत संचलन समारंभ पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे uddhav thackeray यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ‘पोलिसांना सेवा करताना अनेक भूमिका बजावाव्या लागतात. चित्रपटात दाखवतात आणि प्रत्यक्षातील पोलिसांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक असतो. प्रत्यक्षात पोलिसांना जमिनीवर राहून काम करावे लागते. त्यासाठी त्यांना मिळालेल्या प्रशिक्षणाबरोबरच प्रसंगावधान बाळगावे लागते. खडतर प्रशिक्षण पूर्ण करताना जल्लोष होणारच. पण बेहोश होऊन चालणार नाही. जोश आणि होश यांचे तारतम्य बाळगावे लागेल. त्यासाठी भानावर राहावेच लागेल’.

संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर आता ‘हे’ मंत्री येणार अडचणीत; थेट लोकायुक्तांकडेच तक्रार

तसेच ‘आपले शूर जवान गडचिरोलीतही नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करत आहेत. त्यांना टिपत आहेत. महाराष्ट्राच्या मुळावर उठणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी काम करत आहेत. एका बाजूला नक्षलवाद्यांचा आणि दुसऱ्या बाजुला कोरोनाचा सामना करत आहेत. दिसणाऱ्या शत्रुवर तुटून पडता येते. पण ही शस्त्र कोरोनाविरोधात चालत नाहीत. समाजासाठी, लोकांसाठी ते कोरोना काळातही कर्तव्य बजावत आहेत’, असेही मुख्यमंत्री ठाकरे uddhav thackeray म्हणाले.

अमित शाह-शरद पवार यांच्या भेटीवर काँग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

पोलिसांना जमिनीवर राहून काम करावे लागते
प्रशिक्षणार्थींनी तेरा महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या तेरा महिन्यांच्या प्रशिक्षणातून त्यांनी सद़ृढ शरीर कमावले आहेच. पण निरोगी आणि निकोप मनही या सेवेसाठी आवश्यक ठरते. कारण सेवा करताना पोलिसांना अनेक भूमिका बजावाव्या लागतात. चित्रपटात दाखवतात आणि प्रत्यक्षातील पोलिसांमध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो. प्रत्यक्षात पोलिसांना जमिनीवर राहून काम करावे लागते.

केले तर का केले? अन् नाही केले तर का नाही?
प्रशिक्षणार्थींना मिळालेल्या प्रशिक्षणाबरोबरच प्रसंगावधान बाळगावे लागते. केले तर का केले आणि नाही केले, तर का नाही, अशाप्रकारे पोलिसांच्या प्रत्येक कृतीवर प्रश्न विचारला जातो. त्यामुळे खडतर प्रशिक्षणातून मनशक्ती मिळावावी लागते. त्यासाठी इच्छाशक्तीही महत्वाची ठरते, असेही ते म्हणाले.

Also Read:

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काही दिवसांपूर्वीच घेतली होती लस

केंद्राने गोठवला खासदारांचा निधी, खासदारांचा आता राज्याच्या निधीवर ‘डोळा’

शिवसेनेने केली वेगळीच मागणी, ‘मोदींसारख्या सैनिकांना ताम्रपट मिळायला हवे’

Lockdown ला राष्ट्रवादीचा विरोध, मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं ‘लॉकडाऊन राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही’

Related Posts