IMPIMP

Coronavirus : ‘कोरोनाची दुसरी लाटही आली नसती व लोकांचे जीवही गेले नसते’; काँग्रेसचे ट्विट

by Team Deccan Express
maharashtra congress criticised modi govt over corona situation

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरस देशभरात थैमान घालत आहे. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यावरून महाराष्ट्र काँग्रेसने (congress) ट्विट करत केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर टीकास्त्र सोडले. ‘कोरोनाची दुसरी लाटही आली नसती व लोकांचे जीवही गेले नसते’, असे काँग्रेसने म्हटले आहे.

Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’

देशात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लसीकरणही सुरु झाले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा तुटवडा जाणवत असल्याचे समोर आले होते. त्यावरूनच आता महाराष्ट्र काँग्रेसने congress ट्विट करून निशाणा साधला. त्यामध्ये म्हटले, की ‘कोरोनावरील इतरही लसींना मान्यता द्यावी’ हा सल्ला राहुल गांधींनी फार आधीच दिला होता. मात्र, लसीअभावी लसीकरण केंद्र बंद करायची वेळ आल्यावर मोदी सरकारने इतर लसींना मान्यता दिली. जर हा निर्णय आधीच घेतला असता तर कोरोनाची दुसरी लाटही आली नसती व लोकांचे जीवही गेले नसते’.

Belgaum : राष्ट्रवादीचा महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा ! ‘फडणवीस दिल्लीकरांना खुश करण्यात व्यस्त’; जयंत पाटलांचा टोला

दरम्यान, देशात कोरोनाची भयानक दुसरी लाट केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे आहे आणि स्थलांतरित मजूर पुन्हा एकदा गावाकडे परतण्यासाठी हतबल झाले आहेत. सर्वसमान्यांचे जीवन व देशाची अर्थव्यवस्था दोन्हींसाठी लसीकरण वाढवण्यासोबतच त्यांच्या हातात पैसा देणेही आवश्यक आहे. मापदंडानुसार, परदेशी लसींना त्वरीत मान्यता द्यावी, असेही काँग्रेसचे congress वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी यापूर्वीच म्हटले होते.

Also Read :

राष्ट्रवादीचा राम कदमांवर ‘निशाणा’, म्हणाले – ‘मुली उचलून आणण्याची भाषा करणारे, साधूंसाठी आंदोलन करतायेत’

Coronavirus in India : ‘कोरोना’ने सर्वच रेकॉर्ड मोडले ! गेल्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी 1 हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू

अजित पवारांचा फडणवीसांना सणसणीत टोला, म्हणाले -‘आपला नाद कुणी करायचा नाही, सरकार पाडणं हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही’

100 कोटींचे खंडणी प्रकरण : CBI कडून माजी ग्रहमंत्री अनिल देशमुखांची साडेआठ तास चौकशी

चंद्राकांत पाटलांचा दावा, म्हणाले- ‘पुढील महिन्यात ‘या’ तारखेला राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग’

Related Posts