IMPIMP

‘दिल्लीची हुजरेगिरी करुन महाराष्ट्राची बदनामी करणारे हे मंत्री काय कामाचे ?’

by Team Deccan Express
maharashtra congress slams modi government over remdesivir and oxygen shortage in state

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून या लाटेत अनेक जण संक्रमीत होत आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येचा परिणाम आरोग्य यंत्रणेवर होत आहे. देशात महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला आहे. राज्यात 60 ते 70 हजार दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यातच रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आल्याचे पहायला मिळत आहे. राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केल्यानंतर आता काँग्रेसने congress देखील या वादात उडी घेत महाराष्ट्रातील भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांना लक्ष्य केले आहे. दिल्लीची हुजरेगिरी करुन मातृभूमीची बदनामी करणारे हे केंद्र सरकारमधील महाराष्ट्रद्रोही मंत्री महाराष्ट्राच्या काय कामाचे ? असं म्हणत काँग्रेसने congress महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.

भोर पंचायत समिती सभापती निवडणुकीत बंडखोरी केल्याने राष्ट्रवादीतून 2 सदस्यांची हकालपट्टी !

महारष्ट्र काँग्रेसने congress आपल्या ट्विटर अकाउंटवरुन यासंदर्भात एक ट्विट केले आहे. यामध्ये म्हटले की, ऑक्सिजन तुटवड्यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क केला असता, ते बंगालच्या प्रचारात व्यस्त आहेत, असे उत्तर देण्यात येते. रेमडेसिवीर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना पुरवठा करु नका सांगितले जातं. दिल्लीची हुजरेगिरी करुन महाराष्ट्राची बदनामी करणारे हे मंत्री आपल्या काय कामाचे ? असं ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच दिल्लीची हुजरेगिरी करुन मातृभूमीची बदनामी करणारे हे केंद्र सरकारमधील महाराष्ट्रद्रोही मंत्री महाराष्ट्राच्या काय कामाचे ? असे म्हणत एक फोटो ट्विट केला आहे.

महाराष्ट्र काँग्रेसने congress केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे हे नेते महाराष्ट्राची बदनामी करत असल्याचा आरोप केला आहे. रेमडेसिविर या औषधाची आवश्यकता असताना आणि उपलब्धतादेखील असताना तात्काळ निर्णय घेणे ही काळाची गरज आहे. या समस्येचे निराकरण करणे आवश्यक असताना आणि राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांना ताबडतोब रेमडेसिविरचा पुरवठा केला जावा, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

Also Read :

ठाकरे सरकारच्या ‘शिवभोजन थाळी’वर भाजपचा गंभीर आरोप; ‘योजना फक्त दिखाऊ’

एका ओळीचे पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांनी उदयनराजेंना 450 रुपये केले परत

Pandharpur : गोपिचंद पडळकरांचा शरद पवारांवर पुन्हा घणाघात, म्हणाले…

पंढरपूर-मंगळवेढ्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या ! अखेरच्या दिवशी भाजपची एकही प्रचारसभा नाही, उद्या मतदान

अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना पुन्हा डिवचलं, म्हणाले -‘ चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का ?’

Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’

स्मृती इराणींचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘कोरोनासाठी मोदी-शहांना जबाबदार धरणे यातून ममतांचे संस्कार दिसतात’


Coronavirus in India : ‘कोरोना’ने सर्वच रेकॉर्ड मोडले ! गेल्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी 1 हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू

अजित पवारांचा फडणवीसांना सणसणीत टोला, म्हणाले -‘आपला नाद कुणी करायचा नाही, सरकार पाडणं हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही’

Related Posts