IMPIMP

‘महाराष्ट्राला चौकस गृहमंत्री अपेक्षित होते, पंरतु चौकशीदार गृहमंत्री लाभले’ – भाजप

by sikandershaikh
BJP

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)विरोधी पक्ष भाजप (Bharatiya Janata Party – BJP) नं धनंजय मुंडे, संजय राठोड, मेहबूब शेख अशा अनेक प्रकरणावरून ठाकरे सरकारची (Uddhav Thackeray Government) कोंडी केली आहे. इतकंच नाहीतर भाजपनं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरही निशाणा साधला आहे. भाजपनं ट्विट करत यासंदर्भात भाष्य केलं आहे.

‘महाराष्ट्राला चौकस गृहमंत्री अपेक्षित होते, पंरतु चौकशीदार गृहमंत्री लाभले’

राज्यात काही झालं तरी चौकशी करू हे जणू गृहमंत्र्यांचं ब्रीदवाक्य झालं आहे. महाराष्ट्राला खरंतर चौकस गृहमंत्री अपेक्षित होते. पंरतु वास्तवात चौकशीदार गृहमंत्री लाभले. सत्ताधारी पक्षातील नेते असाल तुमच्या चौकशीचं पुढं काही होत नाही. ती प्रलंबितच राहते. बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याचे आरोप असणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना चौकशीदार गृहमंत्र्यांनी चौकशी करू असं बोलून क्लीनचीट दिली. मेहबूब हे राष्ट्रवादीला एवढे प्रिय आहेत की, त्यांनी केक भरवल्याशिवाय जयंत पाटलांचा वाढदिवस होत नाही अशी टीका भाजपनं केली आहे.

‘पक्षप्रेमापोटी अशा प्रकरणांची चौकशी गृहमंत्र्यांना प्रलंबित ठेवावी लागत असावी’

भापनं म्हटलं की, सोशल मीडियावर टीका केली म्हणून गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अभियंत्याला निवासस्थानी बोलवून मारहाण केल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणी चौकशीही प्रलंबित आहे. पक्षप्रेमापोटी अशा प्रकरणांची चौकशी गृहमंत्र्यांना प्रलंबित ठेवावी लागत असावी.

‘सीरम इंस्टिट्युटला लागलेल्या आगीच्या चौकशीचं पुढं काय झालं ? ‘

सीरम इंस्टिट्युटला लागलेल्या आगीच्या चौकशीचं पुढं काय झालं हे केवळ गृहमंत्र्यांनाच माहिती आहे. सीरमला लागलेली आग हे कोणाचं षडयंत्र होतं की फक्त अपघात याची चौकशीही प्रलंबित आहे असा चिमटामही भाजनं काढला आहे.

‘देशाच्या आर्थिक राजधानीत वीज पुरवठा अचानक खंडित झाला, चौकशी प्रलंबित’

12 ऑक्टोबर रोजी देशाच्या आर्थिक राजधानीत वीज पुरवठा अचानक खंडित झाला होता.
राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केल्यानंतर सवयीप्रमाणे चौकशीदार
गृहमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले, याही प्रकरणाची चौकशी अद्याप प्रलंबित आहे अशी टीकाही भाजपनं (bjp) केली आहे.

मंत्री संजय राठोड अधिवेशनापूर्वीच राजीनामा देण्याची शक्यता ?

Related Posts