IMPIMP

Maharashtra Political | शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीलाही खिंडार! सोलापुरातील आजी-माजी दोन आमदार भाजपच्या वाटेवर

by nagesh
Maharashtra Political | after shiv sena ncp madha mla baban shinde likely to join bjp he meet devendra fadnavis

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाMaharashtra Political | राज्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडींची सुत्रे दिल्लीतून फिरवली जात आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) दिल्लीत आहेत. या दौऱ्यावेळी शिंदे-फडणवीस यांनी शिवसेनेपाठोपाठ (Shivsena) राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) धक्का दिला आहे. सोलापूर जिल्ह्यातील दोन आजी-माजी आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहचले आहेत. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) मोठे खिंडार (Maharashtra Political) पडल्याची चर्चा आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दिल्लीत या दोन आजी-माजी आमदारांनी फडणवीस यांची भेट घेतली. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजन पाटील (Former Mohol MLA Rajan Patil) हे भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आता या भेटीनंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार का ? याकडे लक्ष लागले आहे. राजन पाटील हे माजी आमदार आहेत तर बबनदादा शिंदे हे माढा विधानसभा मतदारसंघाचे (Madha MLA Babandada Shinde) आमदार आहेत. एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

मतदारसंघात बबनदादा शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या दिशेने जाण्याचे संकेत दिले जात होते.
जय श्री राम असा संदेश कार्यकर्ते एकमेकांना देत होते. परंतु बबनदादा शिंदे यांनी यावर थेट उत्तर देणं टाळलं होतं.
सूत्रांच्या माहितीनुसार त्यांनी रविवारी रात्री पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती.
मात्र, या भेटीत काही सकारात्मक न घडल्याची माहिती आहे.
बबनदादा शिंदे हे आमदार असल्यामुळे जर अशाप्रकारे त्यांनी भाजपात अधिकृत प्रवेश केला तर त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या (Congress) पदाधिकाऱ्यांना पक्षात सामावून घेण्याचे धोरण आखले आहे.
यामध्ये शिवसेनेला जास्त फटका बसला आहे.
मात्र आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही याची झळ सोसावी (Maharashtra Political) लागत आहे.
राष्ट्रवादीचे स्थानिक नेते, माजी आमदार यांना पक्षात घेण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे.
आगामी विधानसभा व लोकसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून भाजप मेगाभरती पुन्हा सुरु करण्याची शक्यता आहे.
त्यातच काही नेत्यांनी सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निर्णयापर्यंत वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Maharashtra Political | after shiv sena ncp madha mla baban shinde likely to join bjp he meet devendra fadnavis

हे देखील वाचा :

Weight Loss | वजन कमी करत असाल तर कधीही करू नका ‘या’ 4 चूका, ‘करिना’च्या डायटिशियनकडून जाणून घ्या

Elon Musk | गुगलच्या सह-संस्थापकाची पत्नी निकोल शानाहानसोबतच्या कथित प्रेमप्रकरणावर इलॉन मस्क यांचे स्पष्टीकरण; म्हणाले – काल रात्रीच आम्ही…

Diabetes and Fruit | डायबिटीजच्या रुग्णांनी अवश्य करावे ‘या’ फळांचे सेवन, नियंत्रित राहील ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level)

Related Posts