IMPIMP

Maharashtra Political News | देवेंद्र फडणवीस-जयंत पाटलांचा एकाच गाडीतून प्रवास, नव्या समीकरणांचे संकेत?

by nagesh
Maharashtra Political News | bjp leader devendra fadnavis and ncp jayant patil travel in same car to reach programme in nandurbar

नंदुरबार : सरकारसत्ता ऑनलाइन –  Maharashtra Political News | महाराष्ट्राच्या राजकीय गोटात कालपासून अनेक घडामोडी घडत असून संपूर्ण वातावरण ढवळून निघालं आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Political News) मोठी खळबळ उडाली. त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यात शिवसेना-भाजप युती (Shiv Sena-BJP alliance) होणार का ? अशी चर्चा रंगू लागली आहे. या चर्चांदरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP Jayant Patil) यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

नंदुरबार (Nandurbar) येथे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि सहकार महर्षी पी के अण्णा पाटील
(PK Anna Patil) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडत आहे.
या कार्यक्रमासाठी सर्वपक्षीय नेते उपस्थित आहेत.
याच कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचण्यासठी विरोधी
पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील हे एकाच कारमधून (traveled in the same vehicle) गेले.
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा एकत्र कार प्रवास पाहून आता विविध तर्त वितर्क लावण्यात येत आहेत.

शुक्रवारी औरंगाबाद शहरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत व्यासपिठावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) होते.
आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील नंदुरबार जिल्ह्यात एकाच व्यासपिठावर आहेत.
त्यानंतर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (uday samant) हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यासोबत ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात
एकाच व्यासपीठावर आहेत.
त्यामुळे राज्याच्या राजकारणात नेमकं चाललंय तरी काय ? असा प्रश्न निर्माण करणारी ही वस्तूस्थिती आज पहायला मिळत आहे.

Web Title : Maharashtra Political News | bjp leader devendra fadnavis and ncp jayant patil travel in same car to reach programme in nandurbar

हे देखील वाचा :

Mumbai Crime | माणुसकीला काळीमा फासणारी घटना ! 11 वर्षीय मुलीवर सोसायटीच्या वॉचमनकडून लैंगिक अत्याचार

Pune News | खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आढळले 4 महिन्याचे मगरीचे पिल्लू

Pune Police | उद्या पुण्यात बंदोबस्तासाठी 7000 पोलीस तैनात

BJP MP Join TMC | भाजपला मोठा धक्का ! मोदी सरकार 2.0 मध्ये मंत्री राहिलेल्या BJP खासदाराचा TMC मध्ये प्रवेश

Related Posts