IMPIMP

महाविकास आघाडी सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! खासदार उदयनराजे भोसलेंना जोरदार ‘धक्का’, जाणून घ्या

by pranjalishirish
Mahavikas Aghadi government took this big decision ! MP Udayan Raje Bhosale is strongly shocked, know in details

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन-  महाविकास आघाडी सरकारनं आता टोलनाके काढून घेत खा. उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना राजकीय धक्का दिला आहे. सातारा-कोल्हापूर महामार्गावरील साताऱ्यातील आनेवाडी आणि पुण्यातील खेड शिवापूर या टोलनाक्यांचा ठेका अशोका स्थापत्य या कंपनीकडून काढून तो शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांकडे देण्याचा निर्णय झाला आहे.

वडिल राजेंद्र पवारांना ‘कृषीरत्न’ जाहीर होताच पुत्र आमदार रोहित यांचे ‘हे’ ट्विट चर्चेत

अशोका स्थापत्य ही कंपनी साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale  यांचे समर्थक अशोक सावंत यांची आहे. येत्या 3 एप्रिल रोजी हे व्यवस्थापन बदललं जाणार आहे. या पार्श्वभूमीवर या टोलनाक्यांवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावरील सातारा ते पुणे मार्गावरील 2 टोलनाक्यांचं व्यवस्थापन येत्या 3 एप्रिलपासून बदलणार आहे. साताऱ्यातील आनेवाडी आणि पुण्यातील खेड शिवापूर या 2 टोलनाक्यांचा यात समावेश आहे.

शिवेंद्रराजेंना मोठा राजकीय, सामाजिक वारसा’, त्यांचा भविष्यकाळही उज्ज्वल, मी आयुष्यभर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहीन’ – रामराजे निंबाळकर

आनेवाडी आणि खेड शिवापूर या दोन्ही टोलनाक्यांचं व्यवसथापन हे अशोका स्थापत्य कंपनीकडे होतं. आता हेच व्यवस्थापन बदलणार आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या दोन तीन दिवसांपासून साताऱ्यातील आनेवाडी टोलनाक्यावर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.

आनेवाडी टोलनाक्यावरून या पूर्वीच साताऱ्यात अनेक किस्से घडले आहेत. याचं व्यवस्थापन आपल्याकडं यासाठी आ. शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांच्या समर्थक नगरसेवकानं प्रयत्न केले होते. दोन्ही राजांमध्ये त्यावेळी संघर्षा झाला होता. परंतु पुन्हा दोन्ही टोलनाक्यांचं व्यवस्थापन हे खा. उदयनराजे भोसले यांचे समर्थक असलेल्या अशोक सावंत यांच्या अशोका स्थापत्य या कंपनीकडे राहिलं होतं.

‘निवडणुकीमुळं रजनीकांत यांना पुरस्कार दिलाय का?’ मंत्री जावडेकर संतापले, म्हणाले- पत्रकारांनी…

गेल्या काही दिवसापासून या दोन्ही टोलनाक्यांचं व्यवस्थापन 1 एप्रिल पासून बदलावं यासाठी हालचाली सुरू होत्या. याच पार्श्वभूमीवर गेल्या दोन तीन दिवसांपासून टोलनाक्यांवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

सदर दोन्ही टोलनाक्यांचं व्यवस्थापन अशोका स्थापत्य या कंपनीकडून काढून घेत ते पुण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन दोडके तसेच शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश कोंडे यांच्याकडे देण्यात आलं आहे. येत्या 3 एप्रिल रोजी नवीन व्यवस्थापन येणार आहे. दरम्यान भाजपचे खा. उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्यासाठी मात्र हा राजकीय धक्का असल्याचं बोललं जात आहे.

Also Read:

गृहमंत्री देशमुखांवर 100 कोटीच्या हप्ता वसुलीचा आरोपानंतर आता चौकशी समितीवरून ‘कलगीतुरा’, सत्ताधारी-विरोधक ‘आमनेसामने’

IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्जला मोठा झटका ! ‘हा’ ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज IPL च्या बाहेर

Farmers Protest : सर्वोच्च न्यायालयीन समितीची 18 राज्यातील 85 शेतकरी संघटनांसोबत चर्चा, अहवाल सुप्रीम कोर्टात सादर; लवकरच होणार सुनावणी

निवडणुकीच्या भीतीमुळे मोदी-शहा सरकारने निर्णय बदलला’, PPF वरील व्याजदर जैसे थे !

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे स्पष्टीकरण, म्हणाल्या – ‘PPF वरील व्याजदर जैसे थे, तो आदेश नजरचुकीने निघाला’

Lockdown ला विरोध करणाऱ्यांना संजय राऊतांनी सुनावले, म्हणाले -‘लॉकडाऊनचे राजकारण करु नका’

खा. उदयनराजे आणि आ. शिवेंद्रराजे यांच्यात कास धरणाच्या निधीवरून ‘श्रेय’ वाद, जाणून घ्या नेमकं प्रकरण

Related Posts