IMPIMP

Mansukh Hiren Death Case | प्रदीप शर्मांनंतर आता NIA कोणावर करणार कारवाई?

by omkar
Mansukh Hiren Death Case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन : एनआयएच्या ( NIA ) रडारवर असलेले एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना अखेर मनसुख हिरेन (Mansukh Hiren Death Case) मृत्यूप्रकरणी गुरुवारी (दि.17) अटक झाली. 28 जूनपर्यंत शर्माला न्यायालयाने NIA कोठडी सुनावली आहे. दरम्यान, शर्मा यांच्यानंतर आता आणखी एक पोलीस अधिकारी NIA च्या रडारवर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शर्मा यांच्या पीएस फाऊंडेशनमधून काही पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखीन भर पडली आहे.

प्रसिध्द चितळेंच्या दुधात काळा पदार्थ आढळल्याचे सांगत 20 लाखाची खंडणी उकळणार्‍यांना अटक

दरम्यान, शर्मा यांना अटक करण्याआधी पीएस फाऊंडेशनच्या 2 कर्मचाऱ्यांची चौकशी देखील झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
चौकशी केलेल्यापैकी एक कर्मचारी वसईतील नायगावचा असून दोघेही सध्या NIAच्या ताब्यात आहेत. NIA ने न्यायालयात शर्मा यांच्याविरोधात अनेक गंभीर आरोप केले आहेत. मनसुख हिरेनची हत्या प्रदीप शर्मा आणी सचिन वाझे यांच्या आदेशाने झाली आहे हे अटक केलेल्या आरोपींनी कबूल केल्याचा दावा NIA ने केला आहे.

तसेच कारमायकल रोडवरील एक्सप्लोझिव्ह प्रकरणात वाझे याच्यासोबत प्रदीप शर्मा यांचाही सहभाग होता.
एनआयएने गुरुवारी सकाळी प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीतील घरी छापे टाकले.
तसेच शर्मा यांना लोणावळ्यातून ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली.
अखेर चौकशी अंती दुपारी शर्मांना अटक झाली.
शर्मा यांच्यासोबत मनीष वसंत सोनी आणि सतीश यांना देखील अटक झाली आहे.
धक्कादायक म्हणजे हिरेन यांच्या मारेकऱ्यांना या दोघांनीही मोठी रक्कम दिल्याचा दावाही NIA ने केला आहे.
दरम्यान शर्मांच्या वकिलांनी NIA ने कोर्टात केलेले सगळे आरोप फेटाळले आहेत.

Ministry of Home Affairs | दुसर्‍या लाटेपेक्षा सुध्दा भयंकर असू शकते तिसरी लाट

Mansukh Hiren Death Case

Related Posts