IMPIMP

Maratha Reservation । तर.. मग सरकार कोणत्या बाबतीत सकारात्मक?, चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला सवाल

by bali123
Maratha Reservation | chandrakant patil on maratha reservation asked to take action on reservation

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि सध्या आंदोलन सुरु असलेल्या ओबीसी राजकीय आरक्षणावरून (OBC Reservation) राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकास भिडले आहेत. तर आता मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे आक्रमक झाले आहेत. ‘आरक्षणही नाही आणि विद्यार्थ्यांना सवलतीही नाही मग सरकार कोणत्या बाबतीत सकारात्मक आहे. असा सवाल चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उपस्थित केला आहे. त्यावेळी ते माध्यमाशी बोलत होते.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, ‘जोपर्यंत मागास आयोगाचा अहवाल येत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना, तरुणांना इतर सवलती देण्याची मागणी पाटील यांनी केलीय. ‘सारथी सुरु झाली. पण सारथी तारादूत आहे. मराठा समाजाला (Maratha community) मिळणाऱ्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोहचवणारं एक माध्यम, चारशे जण होते, ते कुठे आहेत? यूपीएससी करायला दिल्लीला जाण्यासाठी शिष्यवृत्ती होती, ती कुठे आहे? विदेशात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठीची फेलोशिप कुठे आहे? पण सरकार सकारात्मक आहे. हॉस्टेल सुरु केले? अर्धी फी आकारणार, केलं का?, असे विविध सवाल चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उपस्थित केलेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पुढे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले की,
‘दोन दिवसांचं अधिवेशन नाही,
पुनर्याचिका आत्ता दाखल केली,
मागास आयोगाचं कामकाज नाही,
मराठा नव्याने मागास ठरवणं नाही,
मराठा मागास ठरेपर्यंत सवलती नाही,
तरी कोविड आहे म्हणून आंदोलन करु नका सांगायचं.
पण आम्ही आमचं राजकारण सुरु ठेवणार,
राऊत दोन तास भेटणार उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray),
मग पवार साहेबांना भेटणार, या सगळ्यांना डेल्टा नाही.
असं देखील पाटील यांनी म्हटलं आहे.

Web Titel : Maratha Reservation | chandrakant patil on maratha reservation asked to take action on reservation

Related Posts