IMPIMP

Maratha Reservation | मराठा आरक्षण आंदोलनाबाबत खा. संभाजीराजेंचा सवाल, म्हणाले – ‘मी छत्रपती आहे, कसा मॅनेज होईन?, जरा परिस्थितीच भान बाळगा’

by bali123
Sambhaji Raje Chhatrapati | Inauguration of more than 105 branches of Swarajya parties by Sambhajiraje Chhatrapati

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन –  Maratha Reservation | खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उभ केलेले आंदोलन हे मॅनेज असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र यावर खासदार संभाजीरांजेनी उत्तर दिले आहे. मी छत्रपती आहे, मी कसा मॅनेज होईल, असा सवाल करतानाच त्यांनी सर्वांना परिस्थितीच भान बाळगण्याचाही सल्ला दिला आहे. मराठा समाजाला न्याय मिळावा, ही केवळ आपल्या एकट्याची भूमिका नसून छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि राजर्षी शाहू महाराज (Rajarshi Shahu Maharaj) यांची देखील तीच भूमिका होती. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळवून देण, हे आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचं ध्येय असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. maratha reservation | mp sambhajiraje appeals to think about covid situation while fighting for reservaton

खासदार संभाजीराजेंनी (Sambhajiraje Chhatrapati) मराठा समाजातील समन्वयकांसोबत हितगुज (Discussion) करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कोल्हापूरमधील भवानी मंडपात 2 दिवस ही प्रक्रिया पार पडणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा समाजातील नेते, समन्वयक यावेळी हजेरी लावणार आहे. यावेळी सर्व समन्वयकांसोबत चर्चा केल्यानंतर आपल्या आंदोलनाची पुढची दिशा छत्रपती संभाजीराजे जाहीर करण्याची शक्यता आहे. राज्यात छत्रपतींनी उभारलेला हा लढा पुढील काळात लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. आता संभाजीराजे काय भूमिका जाहीर करतात आणि मराठा आंदोलनाची (Maratha movement) पुढची दिशा कशी असणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मोर्चे काढा, पण परिस्थिती पाहा

कोल्हापुरात काढलेल्या ठोक मोर्चावरही त्यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. आंदोलन करा, मोर्चे काढा, पण आजूबाजूची परिस्थितीही पाहा असे आवाहन त्यांनी मोर्चेकऱ्यांना केले आहे. देश सध्या कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेतून सावरत असून तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत गर्दी न करता आणि कोरोनाबाबतच्या नियमांचे कुठलंही उल्लंघन न करता आपला लढा चालू ठेवण्याचे आव्हान खासदार संभाजीराजेंनी केले आहे.

Web Titel :- maratha reservation | mp sambhajiraje appeals to think about covid situation while fighting for reservaton

Related Posts