IMPIMP

Medha Kulkarni | अव्दितीय अन् अलौकिक ! मेधा कुलकर्णींनी घेतली पंतप्रधानांची भेट, PM मोदींना राखी बांधुन केली ‘ही’ विनंती

by nagesh
Medha Kulkarni | former bjp MLA medha kulkarni tied modi rakhi made important demand

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन भाजपच्या माजी आमदार व भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी गुरुवारी देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी (PM Narendra Modi) यांची दिल्लीत जावून भेट घेतली. त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही भेट घेतली आहे. मुख्यता म्हणजे मेधा कुलकर्णी यांनी पंतप्रधान मोदींना रक्षाबंधन सणानिमित्त राखी देखील बांधली आहे. दरम्यान, त्यावेळी शनिवारवाड्याचा जीर्णोद्धार करण्यासंदर्भात मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी मोदींना निवेदन दिले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची भाजपने समजूत काढत, त्यांचे राजकीय पुनर्वसन करून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाचा मान दिला आहे. महाराष्ट्र राज्यातून असलेल्या एकमेव जागेसाठी कुलकर्णी यांची काही महिन्यांपूर्वी निवड करण्यात आली होती.
त्यानंतर, आता कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. अनेक विषयावर चर्चा देखील केली आहे.

मेधा कुलकर्णी यांनी सध्याच्या काळात स्वत:चा जनसंपर्क कायम ठेवला आहे.
त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात येईल असे सांगण्यातही आलं.
पण, बहे आश्वासनही आश्वासनच राहिले. दरम्यान त्यांनी आता थेट पंतप्रधानांची भेट घेतली आहे.
या भेटीत पुण्यातील लसीकरण, शनिवार वाड्याच्या जीर्णोद्धारासाठी निधी आदी विषयांवर चर्च केली.
तसेच, कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांना एकरकमी 5 लाख किंवा प्रतिमहिना 5 हजार वेतन देण्यात यावे यासाठी आपण राज्य सरकारांना सूचना करावी, अशी विनंती देखील त्यांनी पंतप्रधान मोदींना केली आहे.

Web Title : Medha Kulkarni | former bjp MLA medha kulkarni tied modi rakhi made important demand

हे देखील वाचा :

Pune News | पुण्यात 1 किडनी असलेल्या 3 वर्षाच्या कुत्र्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, देशातील पहिलीच घटना

Pune Crime | पुण्यात दुचाकीस्वार मोबाईल चोरांचा धुमाकूळ ! हडपसर, बिबवेवाडी, वानवडी परिसरात महागडे मोबाईल हिसकावले

Pune Cyber Crime | पुण्यातील ज्येष्ठ महिलेला सीमकार्ड अपडेट करणे पडले 11 लाखांना, 4 परप्रांतियांवर FIR

Related Posts