IMPIMP

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर उदयनराजे शरद पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण

by pranjalishirish
meeting of udayan raje and sharad pawar at Silver Oak

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे गृहमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर दिलीप वळसे-पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी ‘सिल्व्हर ओक’ या त्यांच्या निवासस्थानी गेले. विशेष बाब म्हणजे वळसे-पाटील यांच्यापूर्वी भाजपचे राज्यसभेतील खासदार उदयनराजे भोसले Udayan Raje Bhosle  हेदेखील पवारांच्या भेटीला गेले होते.

चंद्रकांत पाटलांचे मोठं वक्तव्य, म्हणाले – ‘कुणाच्या कुबड्या न घेता 2024 मध्ये स्वबळावर सरकार स्थापन करणार, आणि…’

राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत उदयनराजे भोसले Udayan Raje Bhosle  यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी भाजपकडून लोकसभेची निवडणूकही लढविली. मात्र, त्यामध्ये त्यांचा पराभव झाला. मात्र, या पराभवानंतर भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवले. भाजप खासदार झाल्यापासून उदयनराजे भोसले हे महाविकास आघाडी सरकारविरोधात नेहमी टीका करत आहेत. तसेच त्यांनी मराठा आरक्षणावरूनही राज्य सरकारवर सातत्याने टीका केली. या सर्व घडामोडीनंतर उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चाँना उधाण आले आहे.

‘देशानं पहिल्यांदाच पोलीस बॉम्ब ठेवतात अन् गृहमंत्री हप्ता वसुली करताना पाहिलं’

दरम्यान, पवारांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी त्यांनी भेट घेतल्याचे सांगितले जात असले तरी राजकीय चर्चा सुरू आहेत. उदयनराजे भोसले Udayan Raje Bhosle  यांनी शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो होतो. त्यांचे मार्गदर्शन घेतले, असे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी हे स्पष्टीकरण दिले असले तरीही राजकीय विश्लेषकांच्या आणि कार्यकर्त्यांच्याही भुवया उंचावल्या आहेत.

Read More : 

राज ठाकरेंचं ‘ते’ भाकीत खरं ठरणार?

अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद – मनपा आयुक्त विक्रम कुमार

मुंबई पोलिस काहीच करत नव्हते; देशमुखांच्या राजीनाम्यानंतर किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया

‘आता किमान समान कार्यक्रम म्हणून तिसऱ्या विकेटसाठी काँग्रेसला संधी हवी, अन्याय होऊ नये’, भाजपचा टोला

उदगीर पंचायत समितीच्या इमारतीसाठी 10 कोटींचा निधी मंजूर – राज्यमंत्री संजय बनसोडे

‘अनिल देशमुखांच्या निवासस्थानी 100 कोटींबाबतचे पुरावे नष्ट करण्याचे काम सुरु, CBI ने कारवाई करावी’

‘सचिन वाझे, परमबीर यांनी जे केलं तेच देशमुखांनी कारावे, शरद पवार, उद्धव ठाकरेंनी वसुली करण्याचे सांगितलं असं थेट सांगावं’

जे समोर आलं ते फक्त हिमनगाच्या टोकाप्रमाणे, आगे आगे देखो…होता है क्या?’ – भाजप नेते गिरीश महाजन

Related Posts