IMPIMP

केंद्राने गोठवला खासदारांचा निधी, खासदारांचा आता राज्याच्या निधीवर ‘डोळा’

by pranjalishirish
member of parliament are sending to letters of recommendation to various ministers for development funds

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने लॉकडाऊन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक खर्चांमध्ये कपात करण्यात आली. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने केंद्र सरकारने दोन वर्षांसाठी खासदार निधी funds  गोठवला. केंद्राच्या या निर्णयामुळे खासदारांची चांगलीच पंचाईत झाली आहे. मतदारसंघातील स्थानिक विकासकामांसाठी खासदारांना आता राज्याच्या निधीवर अवलंबून रहावे लागत आहे.

Lockdown ला राष्ट्रवादीचा विरोध, मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं ‘लॉकडाऊन राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही’

केंद्राने खासदार निधी funds  गोठवल्यामुळे मतदारसंघात कोणतीच विकास कामे खासदरांना करता येत नाहीत. आपल्या मतदारसंघातील छोट्या स्वरुपातील विकासकामे मार्गी लागावीत यासाठी खासदारांकडून विविध खात्यांच्या मंत्र्यांकडे शिफारसपत्रे पाठवण्यात येत आहेत. यामध्ये नगरविकास, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, अल्पसंख्याक विकास यासारख्या विभागांकडे शिफारसपत्र पाठवण्याचा खासदारांनी सपाटा लावला आहे. खासदारनिधी मिळत नसल्याने आणि मतदारसंघातील विकास कामे करण्यासाठी आता खासदारांचा राज्याच्या निधीवर डोळा आहे.

शिवसेनेने केली वेगळीच मागणी, ‘मोदींसारख्या सैनिकांना ताम्रपट मिळायला हवे’

नगरविकास खात्यातून शहरातील विकासकामांसाठी, ग्रामविकास विभागातून 2515, 3054 यासारख्या योजनांमधून निधी मिळतो. केंद्राच्या स्थानिक विकास कार्यक्रमातून खासदारांना दरवर्षी पाच कोटी रुपयांचा निधी मिळतो. या निधीमधून लहान-मोठी कामे होत असतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दोन वर्षासाठी निधी गोठवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील खासदारांची मोठी अडचण झाली आहे.

सरकार स्थापनेवर भाजपच्या बड्या नेत्याचे विधान; ‘आता वरून कसा आदेश येतो ते पाहायचे’

कोरोनामुळे केंद्र सरकारने 2020-21 आणि 2021-22 या दोन वर्षासाठी खासदारांचा निधी गोठवला आहे. त्यामुळे राज्यातील लोकसभेचे 48 आणि राज्यसभेवर निवडून गेलेले किंवा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे 19 अशा एकूण 67 खासदारांची मोठी अडचण झाली आहे. त्यांना निधी मिळत नसल्याने 335 कोटी रुपयांची कामे होऊ शकली नाहीत. मात्र, केंद्राने हा निर्णय घेतल्याने खासदारांना या निधीला मुकावे लागले आहे.

आनंद महिंद्रांचा Lockdown बाबत ठाकरे सरकारला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले – ‘त्या’वर पुन्हा लक्ष केंद्रीत करूयात’

राज्यातील आमदारांच्या निधीत दुप्पट वाढ

केंद्राने खासदारांचा निधी funds  गोठवला असताना राज्यातील आमदारांच्या निधीमध्ये दुप्पट वाढ केली आहे. राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मागील वर्षभरात आमदारांच्या स्थानिक विकासनिधीमध्ये दुप्पट वाढ केली आहे. 2011 पासून आमदारांना दोन कोटी रुपये स्थानिक विकासनिधी दिला जात होता. महाविकास आघाडी सरकारने 2020-21 पासून हा निधी तीन कोटी रुपये केला आहे. आता यावर्षी हा निधी एक कोटी रुपयांनी वाढवून चार कोटी केला आहे. त्यामुळे आमदारांना मतदारसंघातील विकासकामे करणे शक्य होणार आहे.

Also Read:

भाजप नगरसेविकेच्या मुलाची आत्महत्या, तपास सुरु

लस घेऊनही शेकापचे आमदार जयंत पाटील ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

राष्ट्रवादीसोबत जाणार का ?, त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात…

भाजपकडून ठाकरे सरकारवर टीका, म्हणाले – ‘शिवसेनेनं आपलं पाप उघड होईल, म्हणून मिठी नदी साफ केली नाही’ (व्हिडीओ)
CM ठाकरेंचे मुख्य सचिवांना आदेश, म्हणाले – ‘Lockdown ची तयारी करा’

Related Posts