IMPIMP

Minister Nitin Raut | पूरग्रस्त भागातील वीज बिल वसुलीला स्थगिती; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची मोठी घोषणा

by nagesh
Nitin Raut | energy minister nitin raut action against corrupt officials of msedcl officer Sumit Kumar suspended

सांगली न्यूज (Sangli News): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)मागील आठवड्यापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy rain) पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) पूर आला. यामुळे अनेक घरांचे नुकसान देखील भरपूर प्रमाणात झाले आहे. रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात जलप्रलय निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नुकसानग्रस्तांची पाहणी करण्यासाठी कोल्हापूर दौऱ्यावर होते. तसेच राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) देखील सांगलीतील (Sangli) पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आले होते. यावरी राऊत यांनी एक मोठी घोषणा केलीय. पूरग्रस्त भागातील वीज बिल (Electricity bill) वसुलीला स्थगिती (Postponement) देण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) यांनी दिले आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

आज शुक्रवारी ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) सांगलीतील (Sangli) पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आले होते.
पूरग्रस्त भागात वीज बिल वसूल करू नका, परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर बिले भरणेसाठी सवलत दिली जाईल.
याच बरोबर वीज बिल माफी बाबत त्यांनी म्हटलं आहे की,
वीज बिल माफीचा निर्णय मी नाही तर मंत्रिमंडळ करणार असल्याचं देखील ऊर्जामंत्री यांनी म्हटलं आहे.
अतिवृष्टीमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) झालेल्या लोकांचे
मोठे नुकसान झाले आहे.
होतं नव्हतं ते सर्वकाही पुराच्या पाण्यात वाहून गेलं.
म्हणून आधीच संकटात सापडलेल्या लोकांना आणखी वीज बिल भरण्याचा डोक्याला ताप नको म्हणून ऊर्जामंत्री राऊत यांनी वीज बिल वसुलीला स्थगिती दिलीय.

दरम्यान, त्यावेळी बोलताना ऊर्जामंत्री राऊत म्हणाले, अधिक मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेड, संगमेश्वर आणि राजापूर तालुका, रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नद्यांना पूर आला आहे.
अशा परिस्थितीत या महापुरात महावितरण आणि महापारेषणच्या यंत्रणांचे देखील आतोनात नुकसान झाले आहे.
या पुरामुळे नादुरुस्त झालेल्या ग्राहकांचे मीटर त्वरित बदलून देण्याचे निर्देश देखील
त्यावेळी ही ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) यांनी दिलेत.

Web Title : Minister Nitin Raut | maharashtra flood energy minister nitin raut stay on collection of electricity bill in flood hit area

हे देखील वाचा :

Shanidev | ‘274’ दिवस ‘या’ राशीच्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक; शनीच्या अशुभ परिणामामुळे होऊ शकते ‘हे’ नुकसान

CM Uddhav Thackeray | ‘आता कठोर निर्णय घ्यावे लागतील, नाहीतर संकट पाठ सोडणार नाही’

Reliance Jio ने आणला सर्वात स्वस्त प्लान, यामध्ये एक प्लान रिचार्ज केल्यास दोन प्लानचा मिळेल फायदा, जाणून घ्या डिटेल

Related Posts