IMPIMP

MLA Rohit Pawar | नगरमध्ये आ. रोहित पवारांचा भाजपला दुसरा धक्का; ‘हा’ बडा कार्यकर्ता राष्ट्रवादीत

by nagesh
MLA Rohit Pawar | another set back for bjp the deputy mayor of karjat municipality will join the ncp rohit pawar up

अहमदनगर :  सरकारसत्ता ऑनलाइन MLA Rohit Pawar | कर्जत-जामखेड मतदारसंघात भाजपला (BJP) धक्का बसताना दिसत आहे. नुकतंच काही दिवसापुर्वी भाजपच्या जिल्हास्तरावरील विश्वासू मानल्या गेलेल्या कार्यकर्त्यांनं राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं. यांनतर आता कर्जत नगरपंचायतीचे भाजपचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत (Namdev Raut) यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून लवकरच तेही राष्ट्रवादीचं (NCP) घड्याळ हाती बांधणार आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघाचं नेतृत्व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्याकडे आहे. यामुळे आता नगरमध्ये रोहित पवारांनीच भाजपला मोठा धक्का दिला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

कर्जत शहरातील भाजपचे असणारे पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने भाजप पक्षासह तेथील भाजपचे (BJP) खासदार डॉ. सुजय विखे पाटील (MP Dr. Sujay Vikhe Patil) आणि माजी मंत्री प्रा. राम शिंदे (Pvt. Ram Shinde) यांना देखील मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, कर्जत नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष आणि सध्याचे उपनराध्यक्ष नामदेव राऊत यांनी आज भाजपमधील प्राथमिक सदस्यासह सर्व पदांचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्याकडे राजीनामा पाठवल्याचं सांगत राष्ट्रवादी पक्षात लवकरच प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

राऊत या भागातील महत्वाचे कार्यकर्ते मानले जातात. शिवसेनेपासून त्यांची राजकीय वाटचाल सुरू झाली. मधल्या काळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला. आता पुन्हा ते राष्ट्रवादीत (NCP) येत आहेत.

पक्ष सदस्यत्वचा राजीनामा हा माझा एकट्याचा निर्णय आहे. काही प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केलीय.
थोड्याच दिवसात सर्वांशी सार्वजनिकरित्या बोलणार आहे.
माझ्या या निर्णयाला महासंग्राम युवा मंचचीही समंती आहे.
राजकीय जीवनात काम करत असताना माजी खा. स्व. दिलीप गांधी, माजी मंत्री प्रा. राम शिंदे, खा. डॉ. सुजय विखे पाटील, माजी आमदार शिवाजीराव कर्डीले, प्रा. भानुदास बेरड, अभय आगरकर यांचे नेहमी सहकार्य लाभले.
भाजपवर आणि कोणत्याही पदाधिकाऱ्याविषयी नाराजी नाही.
जनतेची कामे करत असताना एखाद्या राजकीय पक्षाची गरज असते,
ते लक्षात घेऊन माझी पुढील राजकीय दिशा ठरविण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं उपनगराध्यक्ष नामदेव राऊत म्हणाले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘राष्ट्रवादीचा नगरपंचायतमध्ये एकही सदस्य नसताना आ. रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी निधी दिला. शहरातील जनतेची कामे केली.
त्यांची काम करण्याची पद्धत आपल्याला आवडली.
अर्थात त्यांच्याकडून अद्याप कोणताही शब्द देण्यात आलेला नाही किंवा मीही अपेक्षा ठेवलेली नाही.
चांगल्या निर्णयांच्या पाठीशी राहण्याची आपली भूमिका आहे.
माझ्या या निर्णयाबरोबर जनताही 100 टक्के सोबत राहील याची खात्री असल्याचं राऊत म्हणाले.

Web Title :- MLA Rohit Pawar | another set back for bjp the deputy mayor of karjat municipality will join the ncp rohit pawar up

हे देखील वाचा :

Sanjay Raut | संजय राऊत काय पिऊन बोलतात कळत नाही, नारायण राणेंचा घणाघात

Punjab Politics | कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या राजीनाम्यानंतर आता ‘ही’ नावे मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत

IPS Officer Transfer | राज्यातील 12 आयपीएस अधिकार्‍यांच्या नियुक्त्या

BJP MLA Join NCP and Shivsena | राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपला मोठं खिंडार पडणार?

Related Posts