IMPIMP

MLA Rohit Pawar | जामखेडच्या सतीशला मिळाले नवे आयुष्य ! आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून मिळाले मोफत उपचार

by bali123
MLA Rohit Pawar | Satish appasaheb mane of Jamkhed got new life ! Get free treatment through mla Rohit Pawar

जामखेड : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) MLA Rohit Pawar | कर्जत-जामखेडच्या (Karjat-Jamkhed) नागरिकांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) नेहमीच कार्यरत आहेत. मतदारसंघातील लोकांच्या आरोग्यविषयक प्रश्नांना, समस्यांना प्राधान्याने सोडविण्यासाठी आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) तत्पर आहेत. जामखेड येथील सतीश अप्पासाहेब माने या ३० वर्षीय युवकाला आ. पवार यांच्या माध्यमातून तात्काळ वैद्यकीय सुविधा (Medical facility) प्राप्त झाल्याने नवे आयुष्य मिळाले आहे.

सतीशचा काही महिन्यांपूर्वी अपघात झाला होता. अपघातावेळी सतीशच्या पायाला जबर दुखापत झाली असल्याने त्याच्या पायामध्ये रॉड बसवावा लागला. काही कालावधीनंतर जखम भरून येऊन बरी होणे अपेक्षित होते मात्र तसे होऊ शकले नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी पुढील उपचारासाठी सतीशला सुरुवातीला अहमदनगर व नंतर पुणे येथील रुग्ण्यालयात दाखल केले. मात्र वेगवेगळे वैद्यकीय उपचार करूनही जखम भरून न आल्याने पायामध्ये विष तयार होऊन पाय पूर्ण निकामी होण्याची भीती निर्माण झाली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

माने कुटुंबातील सदस्यांनी आमदार रोहित पवार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सतीशच्या उपचारासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. एक लाखापर्यंत उपचार खर्च डॉक्टरांनी सांगितला होता. आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून सतीशला पुण्यातील नामांकित रुग्णालयात दाखल करून सर्व उपचार मोफत उपलब्ध करून देण्यात आले परंतु तेथे उपचार होऊनही सतीशच्या प्रकृतीत कुठलीही विशेष सुधारणा झाल्याचे दिसून आली नाही. सतीशच्या प्रकृतीचा आमदार रोहित पवार यांनी आढावा घेऊन तज्ञ डॉक्टरांचा सल्ल्याने सतीशला बारामती येथील भोईटे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

दि. २४ जून रोजी सतीशवर डॉ. भंडारे यांनी स्किन ग्राफ्टींगची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली.
सतीशचा जो पाय कापावा लागणार होता, मात्र तसे करण्याची वेळ आली नाही.
आता सतीश पूर्ण ठणठणीत बरा होऊन पूर्वीप्रमाणेच चालायला लागेल.
सतीशला आता आयुष्य जगण्यासाठी नवी उमेद मिळाली आहे.
आजतागायत आमदार रोहित पवार यांनी निरनिराळ्या योजनांच्या माध्यमातून आणि वैयक्तिक लक्ष्य घालून
स्वप्रयत्नांतून हजारो नागरिकांना मदत केली आहे व त्यांचे हे कार्य अविरतपणे सुरु आहे.

Web Title : MLA Rohit Pawar | Satish appasaheb mane of Jamkhed got new life ! Get free treatment through mla Rohit Pawar

Related Posts