IMPIMP

Pune News : मराठीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक; PhonePe चे अन्य भाषेतील 5000 स्टिकर जाळले

by sikandershaikh
MNS raj-thackeray

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)मराठी भाषेच्या वापरावरून आक्रमक भूमिका घेत सातत्यानं आवाज उठवणाऱ्या मनसे (Maharashtra Navnirman Sena – MNS) नं आता आपला मोर्चा फोनपे (PhonePe) कंपनीकडे वळवला आहे. शुक्रवारी मनसेनं पुण्यात मराठी भाषेच्या वापरासाठी आक्रमक पवित्रा घेत फोनपे कंपनीविरुद्ध दंड थोपटत आंदोलन केलं.

पुण्यात फोनपे कंपनीकडून मराठी स्टिकर वापर न करता अन्य भाषिक कन्नड, तेलगू, गुजराती स्टिकर असंख्य आस्थापनावर लावले होते. याचा जाब विचारण्यासाठी व इतर भाषेत लावलेले स्टिकर काढून टाकण्यासाठी मनसेनं (MNS) हे आंदोलन केलं. बाणेर प्रभाग अध्यक्ष अनिकेत मुरकुटे, उपविभाग अध्यक्ष रमेश उभे, उपविभाग अध्यक्ष अशोक दळवी, शाखा अध्यक्ष अभिजीत चौगुले, गणेश चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

बाणेर येथील कार्यक्रमाला भेट देऊन 15 दिवसात इतर भाषेतील पुणे परिसरातील चिकटवलेले स्टिकर
काढून फक्त मराठीतच लावावेत यासाठी मनसेच्या वतीनं निवेदन देण्यात आलं.
इतर भाषेतील 5000 पेक्षा जास्त फोनपे स्टिकर जाळत निषेधही करण्यात आला.

काही दिवसांपूर्वीच मनसेनं अॅमेझोन (Amazon) मराठीत नाही तर अॅमेझॉन नाही अशी भूमिका घेतली होती आणि आंदोलन केलं होतं.
अॅमेझॉनची वेबसाईट आणि अॅपवर इतर भाषांप्रमाणे मराठीतही सेवा उपलब्ध व्हायला हवी अशी मागणी मनसेनं केली होती.
त्यावेळी अॅमेझॉननं कोर्टात धाव घेतली होती.
दिंडोशी कोर्टानं राज ठाकरे आणि इतर पदाधिकाऱ्यांना दिलासा दिला आहे.

Related Posts