IMPIMP

MNS Chief Raj Thackeray | ‘गदाधारी, भेसळयुक्त हिंदुत्ववाल्यांची बांग बंद होणार’; मनसेचा इशारा

by Team Deccan Express
Raj Thackeray | mns leader raj thackeray comment on maharshtra politicis raj thackeray konkan tour

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन   MNS Chief Raj Thackeray | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांचा 5 जून रोजीचा नियोजित अयोध्येच्या दौरा (Ayodhya Tour) अखेर स्थगित करण्यात आला आहे. प्रकृती अस्वस्थामुळे राज ठाकरेंचा दौरा काही काळासाठी स्थगित करण्यात आला असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान पुण्यातील (Pune) सभेत यावर सविस्तर बोलणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. दरम्यान, याआगोदर मनसेचे प्रवक्ते गजानन काळे (MNS spokesperson Gajanan Kale) यांनी एक ट्विट केलं आहे.

”गदाधारी, भेसळयुक्त हिंदुत्ववाल्यांची बांग बंद होणार, तर बेगडी धर्मनिरपेक्षता वाल्यांचे बुरखे फाटणार…ज्वलंत आणि जाज्वल्य हिंदुत्वाची गर्जना होणार..,” असं गजानन काळे यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे. त्यामुळे पुण्यातील सभेत राज ठाकरे नेमकं कोणावर निशाणा साधणार याकडे आता राज्याचे लक्ष असणार आहे. (MNS Chief Raj Thackeray)

तसेच, ”तूर्तास स्थगितचा अर्थ पुढे होईल, असा आहे. जो नेता महाराष्ट्र हितासाठी राज्याच्या अनेक मुख्यमंत्र्यांना अंगावर घेतो, जो नेता राष्ट्रहितासाठी पंतप्रधानांवर टीका करताना कचरत नाही, तो नेता एका खासदाराच्या बडबडण्याने निर्णय बदलेल का? विरोधकांनी तूर्तास स्थगितचा अर्थ लावताना नवनवीन राजकीय शोध लावू नयेत. सर्वांचा चोख हिशोब केला जाईल, पुण्यात!” असं मनसेचे सरचिटणीस कीर्तीकुमार शिंदे (Kirtikumar Shinde) यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंची उद्या पुण्यात सभा –

अयोध्या दौऱ्याआधी राज ठाकरे पुण्यात जाहीर सभा घेणार आहेत. पहिल्यांदा 21 मे रोजी राज ठाकरे यांच्या सभेचं नदीपात्रात आयोजन करण्यात आलं होतं. पण पावसाची शक्यता लक्षात घेता सभेचे नियोजन बदलून आता ती सभा रविवारी 22 मे रोजी गणेश कला क्रीडा रंगमंच (Ganesh Kala Krida Rangmanch) इथे सकाळी 10 वाजता होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Web Title : MNS Chief Raj Thackeray | ahead of mns chief raj thackerays meeting mns spokesperson
gajanan kale has given a warning via twitter

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts