IMPIMP

MNS Chief Raj Thackeray Ayodhya Tour | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित?

by Team Deccan Express
Dasara Melava 2022 | dasara melava 2022 mns first comment on uddhav thackeray rally at shivaji park

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन MNS Chief Raj Thackeray Ayodhya Tour | मागील अनेक दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya Tour) जाणार अशी मोठी चर्चा रंगली आहे. त्यासाठी 5 जूनला अयोध्या दौरा करणार असल्याचं स्पष्ट देखील करण्यात आलं होतं (MNS Chief Raj Thackeray Ayodhya Tour). दरम्यान आता राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा कदाचित स्थगित होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे. (Raj Thackeray’s visit to Ayodhya may be postponed)

पुणे दौऱ्यावर असलेले राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपला दौरा अर्धवट सोडला आणि ते मुंबईला रवाना झाले होते. राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यामुळे शस्त्रक्रीया करावी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान आता एका सुत्रांच्या माहितीनुसार राज ठाकरे यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे 5 जूनला होणारा अयोध्या दौरा पुढे ढकलला जाऊ शकतो. दरम्यान याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसून खूद्द राज ठाकरे याबाबत माहिती देतील असं बोललं जात आहे.

दरम्यान, एकीकडे मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी केली आहे.
तर दुसरीकडे त्यांना विरोध होताना दिसत आहे. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा झाल्यापासूनच त्यांच्या दौऱ्याला अयोध्येतील साधू संत,
तसेच भाजप खासदार बृजभूषण सिंह (BJP MP Brijbhushan Singh) यांचा विरोध होत आहे.
“आधी राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि त्यानंतर त्यांनी अयोध्येत यावे,” असं भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे.
त्याचबरोबर मुस्लिम पक्ष आणि बाबरी मशिद प्रकरणी पक्षकार असलेले इक्बाल अन्सारी (Iqbal Ansari) यांनी देखील राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यालाही विरोध केला होता.
दरम्यान, आता अयोध्या दौऱ्याबाबत राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे मनसैनिकांचे लक्ष लागून आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts