IMPIMP

PM नरेंद्र मोदींकडून राज ठाकरेंच्या पत्राची दखल, मनसेच्या अध्यक्षांनी मानले पंतप्रधानांचे आभार

by Team Deccan Express
mns chief raj thackeray thanks pm narendra modi giving permission produce corona vaccine haffkine

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – देशातील विविध राज्यांमध्ये कोरोनाची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रही याला अपवाद नाही. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्य वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कोरोनाबाबत काही मागण्या केल्या होत्या. त्यातील एक मागणी केंद्र सरकारने मान्य केली आहे. याबाबत राज ठाकरे raj thackeray यांनी ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

राज ठाकरे raj thackeray यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, 100 टक्के लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी या माझ्या विनंतीला आपण मान्यता दिलीत. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मनापासून आभार. केंद्र सरकारकडून असंच सहकार्य मिळत राहिल्यास एकत्रितपणे आपण या संकटावर सहज मात करु हे नक्की, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.

अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना पुन्हा डिवचलं, म्हणाले -‘ चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का ?’

राज ठाकरेंनी कोणत्या 5 मागण्या केल्या होत्या ?
1.
महाराष्ट्र राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करण्याची परवानगी द्यावी.
2. राज्यातील इतर खासगी संस्थांना लस खरेदी करण्याची परवानगी द्यावी.
3. लसीचा पुरवठा वेळेत व्हावा यासाठी हापकिन्स आणि हिंदुस्थान अँटिबायोटिकला लस उपलब्ध करण्याची मुभा द्यावी.
4. सिरमला महाराष्ट्रात स्वतंत्रपणे लस विकण्याची परवानगी द्यावी.
5. राज्याला प्राणवायू आणि रेमडेसिवीर यांचा आवश्यक पुरवठा करता यावा म्हणून मोकळीक द्यावी. या पाच प्रमुख मागण्या राज ठाकरे raj thackeray यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केल्या होत्या.

पंढरपूर-मंगळवेढ्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या ! अखेरच्या दिवशी भाजपची एकही प्रचारसभा नाही, उद्या मतदान

मोदी सरकारने घेतला हा निर्णय
हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. सध्याचा वाढता संसर्ग आणि लसीकरणची मागणी पाहता लवकरात लवकर हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशन यांनी उत्पादन सुरु करावे तसेच हाफकिनमध्ये यादृष्टीने लसीसंदर्भात आवश्यक त्या अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती व्हावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Also Read :

Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’

स्मृती इराणींचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘कोरोनासाठी मोदी-शहांना जबाबदार धरणे यातून ममतांचे संस्कार दिसतात’


Coronavirus in India : ‘कोरोना’ने सर्वच रेकॉर्ड मोडले ! गेल्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी 1 हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू

अजित पवारांचा फडणवीसांना सणसणीत टोला, म्हणाले -‘आपला नाद कुणी करायचा नाही, सरकार पाडणं हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही’

100 कोटींचे खंडणी प्रकरण : CBI कडून माजी ग्रहमंत्री अनिल देशमुखांची साडेआठ तास चौकशी

चंद्राकांत पाटलांचा दावा, म्हणाले- ‘पुढील महिन्यात ‘या’ तारखेला राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग’

Related Posts