IMPIMP

‘व्हायरस वेळीच ठेचायला हवेत’ असं म्हणत अमेय खोपकर संतापले ! केली MP इम्तियाज जलील यांच्यावर कारवाईची मागणी

by bali123
mns leader ameya khopkar has criticized imtiaz jalil

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – औरंगाबादमध्ये 31 मार्चपासून सुरू होणारा लॉकडाऊन रद्द करण्यात आला आहे. यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांच्या समर्थकांनी इम्तियाज जलील यांच्या ऑफिससमोर मोठी गर्दी करत जल्लोष केला. इतकंच नाही तर कार्यकर्त्यांनी जलील यांना पुष्पहार घालत रस्त्यावर त्यांची मिरवणूकही काढली. इम्तियाज जलील यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना कोरोनाचा विसर पडला. याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी जलील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे आज भूमिपूजन

‘एमआयएमच्या नेत्यांनी लाज गुंडाळून डोक्याला बांधली आहे का ?’
अमेय खोपकर ameya khopkar यांनी ट्विट करत यावर भाष्य केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये ते लिहितात, एमआयएमच्या नेत्यांनी लाज गुंडाळून डोक्याला बांधली आहे का ? संभाजीनगरमध्ये लॉकडाऊन स्थगित झाला म्हणून इम्तियाज जलील आणि त्यांच्या पक्षानं मोठा जल्लोष केला. संभाजीनगरमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. परिस्थिती गंभीर असताना जल्लोष करून नाचताना शरम वाटायला पाहिजे अशी टीका त्यांनी केली आहे.

ठाकरे स्मारकाच्या भूमीपूजनाला एकनाथ शिंदेंनाही डावललं? भाजप आमदारानं शेअर केली निमंत्रण पत्रिका !

‘हे असे व्हायरस वेळीच ठेचायला हवेत, उल्लंघन करणाऱ्या स्टंटबाज नेत्यांवर कारवाई व्हावी’
पुढं बोलताना अमेय खोपकर म्हणतात, हा प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार आहे. हे असे व्हयरस वेळीच ठेचायला हवेत. कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्या या असल्या स्टंटबाज नेत्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी देखील खोपकर यांनी केली आहे.

Pandharpur : राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरूध्द बंडखोरी करणार्‍या शिवसेनेच्या शैला गोडसे यांच्यावर CM ठाकरेंच्या आदेशाने कारवाई

उद्यापासून म्हणजेच 31 मार्च ते 9 एप्रिल असा लॉकडाऊन औरंगाबादमध्ये लागू होणार होता. परंतु लॉकडाऊन होणार म्हणून गेल्या 2 दिवसांपासून बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांसह पत्रकार परिषद घेत लॉकडाऊन रद्द केल्याची घोषणा केली.

दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याच्या निर्णयाविरोधात इम्तियाज जलील यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. जलील यांनी 31 मार्चला आंदोलन करणार अशी घोषणाही केली होती.

Also Read:

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले…

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना राज्यात ‘No Entry’ ! ठाकरे सरकार आणणार स्वतंत्र कायदा

…तर देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय पर्याय नाही; शिवसेनेला सोडचिठ्ठी दिलेल्या नरेंद्र पाटलांचे वक्तव्य

Kerala election : भाजपने 5 वर्षांपूर्वी उघडलेले खाते ‘या’ वर्षी आम्ही बंद करणार; ‘या’ नेत्याची जोरदार टीका

Related Posts