IMPIMP

‘मिर्झापूर असो किंवा महाराष्ट्र, राजकारणात प्यादीच मरतात’, मनसेचा व्हिडीओ शेअर करत सरकारवर निशाणा

by bali123
sachin vaze

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेली गाडी सापडल्यानंतर या प्रकरणाचा तपास एनआयएने सुरु केला आहे. या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे sachin vaze यांना अटक करण्यात आली आहे. सचिन वाझे sachin vaze यांना अटक केल्यानंतर नवनवीन माहिती समोर येत आहे. सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे.

अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली गाडी आणि गाडी मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात सचिन वाझे (sachin vaze) यांना अटक करण्यात आली. या दोन्ही प्रकरणांचे धागेदोरे एकमेकांशी जोडलेले आहेत. या प्रकरणावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. तर भाजप खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्विकारुन राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. विरोधकांकडून ठाकरे सरकारवर आरोपांच्या फैरी सुरु असताना मनसेने एक व्हिडीओ फेसबुकवर शेअर करत सरकारवर निशाणा साधला आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे मिर्झापूर असो किंवा महाराष्ट्र राजकारणात प्यादीच मरतात, असा टोला देशपांडे यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे. यापूर्वी संदीप देशपांडे यांनी महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येवरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. कोरोनाचे महाराष्ट्रावर प्रेम आहे की महाराष्ट्र सरकारचे कोरोनावर प्रेम आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

Amol Kolhe : इंद्रायणी मेडीसिटी प्रकल्पाला विशेष निधी द्या ; खा.डॉ.अमोल कोल्हेंची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मागणी ! लोकसभेत केलं अभ्यासपूर्ण भाषण (Video)

भाजप नेत्याचा सवाल, म्हणाले – ‘मुख्यमंत्री ठाकरे वाझेंसाठी इतक्या बैठका का घेतायत?’

शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

‘देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालतायेत? गुन्ह्यात सहभागी होऊ नका’, काँग्रेस नेत्याचं विधान

काँग्रेस नेत्याचे शरद पवारांना पत्र पाठवून आवाहन, म्हणाले – ‘पवार साहेब, प्रचाराला येऊ नका, लोकांचा गोंधळ उडेल’ 

Related Posts