IMPIMP

‘संसाधने तसेच लस उपलब्ध आहे, मग लॉकडाऊन का ?’, मनसेचा Lockdown ला विरोध, ठाकरे सरकारवर साधला ‘निशाणा’

by pranjalishirish
mns sandeep deshpande criticizes thackeray government over lockdown in maharashtra

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. दररोज 30 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहे. राज्यात लसीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. च्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. मात्र, लॉकडाऊनला lockdown  आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला आहे. तसेच विरोधी पक्ष भाजपने देखील याला विरोध केला असताना आता मनसेने देखील लॉकडाऊनला विरोध केला आहे.

Lockdown ला राष्ट्रवादीचा विरोध, मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं ‘लॉकडाऊन राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही’

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, लॉकडाऊन  lockdown  केल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी होते असं शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं नाही. तसं काही असेल तर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगावं, असं देशपांडे यांनी म्हटलं आहे. गेल्यावर्षी लॉकडाऊन करण्यात आलं. त्यावेळी राज्य सरकार आणि सर्वसामान्यांना या संदर्भात कोणतीच माहिती नव्हती. मात्र, गेल्या वर्षभरात कोरोनावर कोणते वैद्यकीय उपचार करावे लागतात. त्यांच्यासाठी लागणारी संसाधनं उपलब्ध आहेत, लस उपलब्ध आहे, मग लॉकडाऊन का ? असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

शिवसेनेने केली वेगळीच मागणी, ‘मोदींसारख्या सैनिकांना ताम्रपट मिळायला हवे’

हप्ते मिळत नसल्याने हॉटेल,बार बंद केले का ?

संदीप देशपांडे यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की, रात्री आठ वाजता हॉटेल्स आणि बार बंद करण्यात आले आहेत. हप्ते मिळत नसल्याने हे बंद करण्यात आले आहेत का ? असा सवाल करत देशपांडे यांनी सरकावर टीका केली आहे. तसेच प्रसार माध्यमांनीही लोकांना बेजबाबदार म्हणून कोरोनाची भीती घालू नये, असा सल्ला दिला.

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काही दिवसांपूर्वीच घेतली होती लस

राष्ट्रवादीचा लॉकडाऊनला विरोध

दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. एका दिवसात 40 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहे. मात्र, लॉकडाऊन  lockdown हा शेवटचा पर्याय नाही. लॉकडाऊन राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे लॉकडाऊन हा पर्याय नसल्याचा आग्रह धरला आहे. राज्यात रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी सचिवांना लॉकडाऊनची तयारी करण्यास सांगितले आहे. मात्र याचा अर्थ लॉकडाऊनच केले पाहिजे असे नाही. जर लोकांनी नियम पाळले तर लॉकडाऊन टाळता येऊ शकते, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

Also Read:

भाजप नगरसेविकेच्या मुलाची आत्महत्या, तपास सुरु

लस घेऊनही शेकापचे आमदार जयंत पाटील ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

राष्ट्रवादीसोबत जाणार का ?, त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात…

भाजपकडून ठाकरे सरकारवर टीका, म्हणाले – ‘शिवसेनेनं आपलं पाप उघड होईल, म्हणून मिठी नदी साफ केली नाही’ (व्हिडीओ)

CM ठाकरेंचे मुख्य सचिवांना आदेश, म्हणाले – ‘Lockdown ची तयारी करा’

आनंद महिंद्रांचा Lockdown बाबत ठाकरे सरकारला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले – ‘त्या’वर पुन्हा लक्ष केंद्रीत करूयात’

केंद्राने गोठवला खासदारांचा निधी, खासदारांचा आता राज्याच्या निधीवर ‘डोळा’

Related Posts