IMPIMP

आ. शिवेंद्रराजे यांचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘Lockdown लावून प्रशासनाकडून मोगलाई’

by pranjalishirish
moglai from the administration by imposing lockdown says mla shivendraraje

सातारा : कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यावरून विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. त्यानंतर आता भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सरकार इशारा दिला आहे. ‘यापूर्वीच्या लॉकडाऊनला Lockdown  व्यापार्‍यांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य केलेले आहे. सरसकट बंद करणे योग्य नाही. हा निर्णय तातडीने बदलावा. अन्यथा लोकात उद्रेक होईल’, असे ते म्हणाले.

फक्त शिवसेना अन् राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा देण्याची जबाबदारी आहे का ?

सातार्‍याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी 6 ते 30 एप्रिलपर्यंत सर्व दुकाने, व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाला सातारा शहरातील व्यापार्‍यांनी विरोध करत दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी शासनाच्या व जिल्हा प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. व्यापारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन निवेदन दिले. ते म्हणाले, ‘कोरोना वाढतोय म्हणून सगळेच बंद करा हा जिल्हा प्रशासनाकडून मोगलाईचा प्रकार सुरू आहे. सरसकट बंदला सातार्‍यातील व्यापार्‍यांचा विरोध आहे. यापूर्वीच्या लॉकडाऊनला Lockdown  व्यापार्‍यांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य केलेले आहे. सरसकट बंद करणे योग्य नाही. हा निर्णय तातडीने बदलावा. अन्यथा लोकात उद्रेक होईल’.

Pravin Darekar : ‘मुख्यमंत्र्यांचं मौन म्हणजे खुर्चीसाठी शांत बसणं अन्…’

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने व्यापार्‍यांना विश्वासात न घेता सगळेच बंद ठेवणे योग्य नाही. गुढीपाडव्याचा सण आला असून, व्यापार्‍यांनी मालही भरलेला आहे. अशा परिस्थितीत दुकाने बंद ठेवणे योग्य नाही. प्रशासनाने बांधकाम व्यवसाय सुरू ठेवला आहे. पण त्यासाठी लागणार्‍या साहित्यांची दुकाने मात्र, बंद ठेवली आहेत, असेही ते म्हणाले.

Read More : 

Coronavirus Cases India : देशात पहिल्यांदा एका दिवसात नोंदली गेली संसर्गाची 1.07 लाख प्रकरणे, केंद्राने लोकांना केले ‘हे’ आवाहन

Mini Lockdown : ‘सरकारने आनंदाने लॉकडाऊन लावला नाही, ही नामुष्की ओढवली’, निर्बंधावर राऊतांचे ‘कडक’ मत

चित्रा वाघ-रुपाली चाकणकर यांच्यात रंगला ‘कलगीतुरा’ !

परमबीर सिंग NIA च्या कार्यालयात ! सचिन वाझे, अँटिलिया प्रकरणी जबाब नोंदवणार

‘मुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांवर नियंत्रण नाही, आता राजीनाम्यासाठी रांग लागेल’, केंद्रीय मंत्र्याचा दावा

‘त्या’ वक्तव्यावरुन संजय निरुपम यांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाले -‘बहिरा नाचे आपन ताल…’

‘खा. प्रताप पाटील-चिखलीकरांची माणसे निवडून देऊ नका, भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल’; भाजपमधील गटबाजी उघड

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज शरद पवारांची भेट घेणार

पंढरपूर पोटनिवडणुकीतील भाजपचे ‘स्टार’ प्रचारक कोरोनाबाधित

Related Posts