IMPIMP

Money Laundering Case | नवाब मलिकांचे पाय खोलात ! डॉन दाऊदशी संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे; न्यायालयाचे निरीक्षण

by Team Deccan Express
Money Laundering Case | nawab malik in connection with dawood ibrahim says court haseena parkar money laundering case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Money Laundering Case | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) आणि महाविकास आघाडीमधील मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात (Money Laundering Case) नवाब मलिक यांचे दाऊदच्या टोळीशी (Underworld Don Dawood) थेट संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे आहेत, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ED) मलिक यांच्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल मुंबई विशेष न्यायालयाने (Mumbai Special Court) दखल घेतली आहे.

मुंबईतल्या गोवावाला कंपाऊंडला हडप करण्यासाठी दाऊदच्या टोळीची थेट मदत घेतल्याचे सकृतदर्शनी पुरावे असल्याचे न्यायालयाने म्हटलं आहे. दरम्यान, नवाब मलिक यांनी डी कंपनीशी संबंधित असलेल्या हसिना पारकर (Hasina Parkar), सलीम पटेल (Salim Patel), सरदार खान (Sardar Khan) यांच्यासोबत मनी लाँड्रिंग साठीच गोवावलाल कंपाऊंडच्या अफरातफरीचा हा कट रचला आहे. ज्यामधून या सर्वांनी मोठा आर्थिक घोटाळा करून बेहिशेबी मालमत्ता जमवली. त्यामुळे पीएमएलए कायद्यानुसार (PMLA Act) हे सर्व आरोपी या गुन्ह्याशी थेट संबंधित असल्याने शिक्षेसाठी पात्र आहेत. त्यानंतर ती भाडेपट्टी अस्लमच्याच नावावर करण्यात आली. असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. (Money Laundering Case)

या दरम्यान, गोवावाला कम्पाऊंडमध्ये असलेली मालमत्ता 1992 च्या पुरानंतर बंद करण्यात आली होती. त्यावर नवाब मलिकांनी आपल्या काही माणसांच्या मदतीने ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता. येथील मालमत्ता बळकावण्यासाठी मलिकांनी दाऊदच्या गँगची (Dawood Gang) थेट मदत घेतल्याने सकृतदर्शनी पुरावे आढळले आहेत. असं कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Web Title : Money Laundering Case | nawab malik in connection with dawood ibrahim says court haseena parkar money laundering case

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts