IMPIMP

MP Imtiyaz Jaleel | Corona चे नियम धाब्यावर बसवत एमआयएमचे खासदार जलील यांच्यावर नोटांची उधळण; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

by bali123
MP Imtiyaz Jaleel | corona rules violation scattering notes mp Imtiyaz Jaleelvideo goes viral

औरंगाबाद न्युज (Aurangabad News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) MP Imtiyaz Jaleel | कोरोना (Corona) च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहे. असे असतानाही दौलताबाद रस्त्यावरील रिसॉर्टमध्ये एका कव्वाली (Qawwali) च्या कार्यक्रमात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MIM MP Imtiyaz Jaleel) सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांच्यावर नोटांची उधळण करण्यात आली होती. या कार्यक्रमात कोरोनाचे नियम धाब्यावर बसवले होते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

कोरोनाची दुसरी लाट (corona second wave) ओसरत असताना पुन्हा एकदा बाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहे. सार्वजनिक कार्यक्रम, पार्ट्या आणि हॉटेल्संना रात्रीची बंदी घालण्यात आली आहे. मात्र, खासदार इम्तियाज जलील (MIM MP Imtiyaz Jaleel) यांच्यासाठीच हे नियम भंग करुन कायद्याचे उल्लंघन करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

शनिवारी मध्यरात्री औरंगाबाद (Aurangabad) च्या दौलताबाद रस्त्यावरील रिसॉर्ट (Resort on Daulatabad Road) मध्ये कव्वाली (Qawwali) चा कार्यक्रम सुरु होता. खासदार जलील यांचा कार्यक्रमातील व्हिडिओ सोशल मीडिया (Social Media) वर व्हायरल झाला आहे. विकेंड असतानाही हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमातील उपस्थितांची संख्या १०० पेक्षा जास्त होती. त्यांनी मास्कही घेतला नसल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

यापूर्वीही झाला होता नियमांचा भंग

खासदार इम्तियाज जलिल (MIM MPImtiyaz Jaleel) यापूर्वीही लॉकडाऊन नियमाचा भंग केला होता. जिल्हा प्रशासनाने ३१ मार्च ते ९ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याची तयारी होती. अंमलबजावणी होण्याच्या २ तास आधी लॉकडाऊन (Lockdown) रद्दची घोषणा जिल्हाधिकाऱ्यानी केल्याने खासदार इम्तियाज जलिल यांनी समर्थकांसोबत रात्री १०. ४५ वाजेच्या दरम्यान रस्त्यावर जल्लोष केला. या प्रकरणी सिटीचौक ठाण्यात त्यांच्यावर कोरोना नियम आणि संचारबंदी (Curfew) चे उल्लंघन केल्याचा गुन्हा FIR दाखल करण्यात आला आहे.

Web Title : MP Imtiyaz Jaleel | corona rules violation scattering notes mp Imtiyaz Jaleelvideo goes viral

Related Posts