IMPIMP

MP Sambhaji Raje | खा. संभाजीराजेंचा राज्य सरकारला इशारा; म्हणाले – ‘…तर त्याला मी जबाबदार राहणार नाही’

by nagesh
Maratha Reservation | government does not consider any demands maratha community said chhatrapati sambhaji raje

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha reservation) राज्य सरकारच्या भुमिकेवर राज्यसभेचे खासदार संभाजीराजे भोसले (MP Sambhaji Raje) यांनी जोरदार टिकास्त्र सोडलं होतं. स्वत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत पाठवलेलं पत्र आपल्याला मान्य नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तर, राज्य सरकारने पाठवलेलं पत्र अधिकाऱ्यांनी लिहून पाठवलंय. फक्त पाठवायचं म्हणून हे लेखी उत्तर पाठवलंय. मुख्यमंत्र्यांनी देखील याची पुरेशी दखल घेतली नाहीये, असं म्हणत खा. संभाजी राजे (MP Sambhaji Raje) यांनी आपला संताप व्यक्त केला. त्यावेळी ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

नुकतंच खा. संभाजीराजे (MP Sambhaji Raje Bhosale) यांनी नांदेड (Nanded) येथे घेतलेल्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
या गर्दीला शांत करण्याचा प्रयत्न त्यावेळी संभाजीराजे यांनी केल्याचं दृश्यांमध्ये दिसून आलं होतं.
त्याचा संदर्भ घेत संभाजीराजे यांनी राज्य सरकारला अप्रत्यक्षपणे इशाराच दिला आहे.
‘आवाज उठवायचा म्हटला, तर मी करू शकतो.
आम्ही न बोलवता किंवा सांगता देखील नांदेडला 50 ते 70 हजार लोक हजर होतो.
रायगडसारख्या ठिकाणी आम्ही सुरुवात करू.
जर सरकार दखल घेत नसेल आणि आम्ही करायचंच असेल तर करू शकतो.
नांदेड ही फक्त एक झलक होती. तीही न सांगता. सांगून बघू का? मग बघा, असं ते म्हणाले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पुढे बोलताना खा. सभांजीराजे म्हणाले की, आमची परीक्षा घेऊ नका.
सरकारनं ठरवावं, तेव्हा बैठकीला बसायची आमची तयारी आहे.
पण सरकारची तयारी नसेल, तर रायगडावर बसून आमची मूक आंदोलनाची तयारी आहे.
मग नांदेडला जशी गर्दी जमली, तशी गर्दी जमली तर मी जबाबदार राहणार नाही.
हे चालेल का सरकारला?, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
आपण समाजाला वेठीला न धरता एकटे आंदोलन करू, ज्यामुळे कोरोनामध्ये होणारी गर्दी टाळता येईल.
असं देखील त्यांनी नमूद केलं.

दरम्यान, सभांजीराजे (MP Sambhaji Raje Bhosale) म्हणाले, आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या बाबतीत म्हटलंय की, 1885 कोटी रुपयांचा निधी वाटला.
हे अधिकारी लोकं एवढे फसवतात. हे पैसे सरकारने दिलेले नसून बँकांनी दिलेले आहेत.
हे मागच्या सरकारने केलेलं आहे. तुम्ही किती दिले हे अधिकाऱ्यांनी सांगावं.
आत्ता जाहीर केले साडेबारा कोटी रुपये. जे पूर्वीच्या सरकारने केलं.
त्यापुढे आत्ताच्या सरकारने काहीही केलेलं नसल्याचं ते म्हणाले.

Web Title : MP Sambhaji Raje | sambhaji raje bhosale targets cm uddhav thackeray on maratha reservation

हे देखील वाचा :

Nandurbar News | अर्ध्यावरच प्रवास थांबला ! दरड कोसळल्याने घाट बंद, उपचारासाठी पत्नीला खांद्यावर घेऊन जात असताना पत्नीचा वाटेतच दुर्दैवी मृत्यू

Crime News | एकटीला बघुन रुममध्ये घुसला अन्.., महिला IPS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत केलं विकृत कृत्य

Related Posts