IMPIMP

MP Sanjay Jadhav | शिवसेना खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले – ‘राष्ट्रवादीला आम्ही कधीही बुडवू’

by nagesh
MP Sanjay Jadhav | we will drown ncp shiv sena mp sanjay jadhav controversy over appointment of district collector

परभणी (Parbhani): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) नुकतंच परभणीच्या जिल्हाधिकारी पदी आंचल गोयल (Aanchal Goyal) यांची नियुक्ती करण्यात आलीय. या मुद्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी (Shiv Sena and NCP) यांच्यात वादाची घडी पलटत जाताना दिसत आहे. त्या दोन्ही पक्षातील वाद पुढं आला आहे. पदनियुक्तीनंतर वाद उफाळल्यानंतर आंचल गोयल यांची जिल्हाधिकारी पदावर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नियुक्ती केली गेली. तर, नियुक्ती होऊ नये यासाठी शिवसेना खासदाराने थेट मंत्रालयात याबाबत सांगितलं असल्याची चर्चा होती. तर आता, नियुक्तीवरून शिवसेना खासदार संजय जाधव (MP Sanjay Jadhav) यांनी राष्ट्रवादीवर घणाघाती टीका केलीय. ‘राष्ट्रवादीला आम्ही कधीही बुडवू शकतो’ असं वादग्रस्त वक्तव्य जाधव (MP Sanjay Jadhav) यांनी केलं.

खासदार संजय जाधव (MP Sanjay Jadhav) हे शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘जेव्हा माकडीण सुद्धा स्वतः बुडायची वेळ आली तेव्हा पिल्लांना पायाखाली घालते तर लक्षात ठेवा राष्ट्रवादीला आम्ही कधीही घालू. शेवटी आता खूप सहनशक्तीच्या पलीकडे गेलो. असं त्यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना संजय जाधव म्हणाले की, ‘काल फक्त कलेक्टर बदलायचा होता तर मी फक्त मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली होती. पण त्या राष्ट्रवादीवाल्यांनी एवढं रान पेटवलं जसे काही मोठा अपराध केला. आपलं घ्यायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी राष्ट्रवादीवाल्यांची अवस्था आहे. पण तरीही मुख्यमंत्र्यांचा आदेश आम्ही मान्य केला आहे. शेवटी काही मर्यादा असतात कुठं पर्यंत शांत बसायचं आहे, कुठं पर्यंत सहन करायचं आहे, असे ते म्हणाले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

काय आहे प्रकरण?

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या सेवानिवृत्तीनंतर जिल्हाधिकारी पदी आंचल गोयल या पदभार स्वीकारणार होत्या.
त्यातच अचानक आपण अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे पदभार सोपवावा असा संदेश मुगळीकर यांना सामान्य प्रशासन विभागाकडून आला.
यामुळे गोयल यांच्या पदभाराचे रखडले. या विषयाची चर्चा राज्यभर होऊ लागली.
परभणी जिल्ह्यात आपलेच ऐकणारे अधिकारी हवेत अशी काही चर्चा फिरू लागली.
या विषयावरून जागरूक नागरिक आघाडी आक्रमक झाले.
अखेर कौशल्य विकास मंत्री आणि परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक (Nawab Malik)
यांनी जिल्हाधिकारी म्हणून आंचल गोयल यांचीच नियुक्ती होईल असं स्पष्ट केले.

Web Title :- MP Sanjay Jadhav | we will drown ncp shiv sena mp sanjay jadhav controversy over appointment of district collector

हे देखील वाचा :

Delta Plus Variant | राज्यात डेल्टा प्लसचा धोका वाढला; बीडमध्येही आढळला रुग्ण

Bombay High Court | विवाहित महिलेच्या अंगावर प्रेमपत्र फेकणे हा विनयभंगच; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

Maratha Kranti Morcha | मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत नीरज चोप्राचा सत्कार करण्याचा ठराव

Related Posts