IMPIMP

MP Supriya Sule | शेतकऱ्यांवर अन्याय होणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस सहन करणार नाही – खा. सुप्रिया सुळे (व्हिडीओ)

by nagesh
MP Supriya Sule | If injustice is done to farmers, NCP will not tolerate it. Supriya Sule (Video)

पुणे : सरकारसत्ताऑनलाइन–  MP Supriya Sule | उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीमध्ये (Lakhimpur Kheri) झालेल्या हिंसाचाराचे तीव्र प्रतिसाद उमटत आहेत. येथील शेतकरी आंदोलनादरम्यान रविवारी हिंसाचार घडला. यामध्ये 8 जणांचा मृत्यु झाला. त्यात 4 शेतक-यांचा समावेश आहे. तर अनेक लोक जखमी झाले. त्यावेळी त्याठिकाणी आलेल्या काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या हिंसाचाराचे पडसाद बुधवारीदेखील उमटत आहेत. या घटनेवरुन नुकतंच राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत भाजपवर (BJP) हल्लाबोल केला. यानंतर आज राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) या आज (बुधवारी) पुण्यात (Pune) आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एवढी घटना होऊन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) काही बोलत नाहीत. त्याबाबत त्यांना विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, या घटनेबाबत शरद पवार यांनी सविस्तर भूमिका मांडलेली आहे. तसेच कोणताही अन्याय महिलेवर किंवा शेतकर्‍यावर होत असल्यास राष्ट्रवादी काँग्रेस कधीच सहन करणार नाही. आम्ही प्रियांका गांधी यांच्या सोबत आहोत. तसेच पंतप्रधान कधीच अशा गोष्टींवर काही बोलत नाहीत, असं म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला.

लखीमपूर येथील शेतकरी महात्मा गांधीजींच्या मार्गाने आंदोलन करत होते. मात्र त्यावेळी त्यांच्यावर गाडी चालवण्यात आली.
त्या उत्तरप्रदेश सरकारने शेतकऱ्यांवर हल्ला केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीच अशा गोष्टींवर बोलत नाही.
बलात्कार झाला, तेव्हाही काही बोलले नाहीत. त्यामुळे मला काहीच आश्चर्य वाटत नाही. असं सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी म्हटलं आहे.

Web Title : MP Supriya Sule | If injustice is done to farmers, NCP will not tolerate it. Supriya Sule (Video)

हे देखील वाचा :

HR Manager Suicide | खळबळजनक ! प्रसिद्ध कंपनीतील 30 वर्षाच्या HR मॅनेजरची आत्महत्या, सुसाईड नोट मिळाली

Dhule Zilla Parishad Election | धुळ्यात महाविकास आघाडीला दणका ! चंद्रकांत पाटलांच्या मुलीची ‘बाजी’

IPL Cricket Betting | आयपीएल मॅचवरील बेटिंगप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुलाला अटक

Related Posts