IMPIMP

MPSC | राज्यातील 15,511 रिक्त पदांच्या भरतीसाठी वित्त विभागाची मंजुरी, अजित पवार यांची माहिती

by bali123
MPSC | ajit pawar announces finance department approved recruitment 15 511 vacancies state

मुंबई न्यूज (Mumbai News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) राज्यातील विविध विभागातील 15 हजार 511 रिक्त पदांची एमपीएससीकडून (MPSC) भरती करण्यात येणार आहे. या विभागांच्या पद भरतीसाठी वित्त विभागाने मंजुरी दिली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. एमपीएससी (MPSC) मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. यानंतर याचे पडसाद संपूर्ण राज्यभरातून उमटत आहे. तसेच विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात देखील याचे पडसाद उमटले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

एमपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्वप्नील लोणकर (Swapnil Lonakar) या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या मुद्यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 31 जुलै पर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा केली होती. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी या संदर्भात माहिती देताना अजित पवार यांनी भरतीसाठी वित्त विभागाची (Finance Department) मंजुरी मिळाल्याचे सांगितले.

MPSC कडून रिक्त पदे भरण्यात येणार

ज्या ज्या विभागांनी रिक्त पदे भरण्याचे प्रस्ताव दिले, त्याला वित्त विभागाने मंजुरी दिली असल्याचे
अजित पवार यांनी सांगितले. त्यानुसार 2018 पासून विविध संवर्गातील रिक्त असलेली पदे महाराष्ट्र
लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणार आहेत. त्यापैकी गट अ – 4417, गट ब – 8031,गट क –
3063 इतकी पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यास वित्त विभागाने मंजुरी दिली आहे.

Web Titel : MPSC | ajit pawar announces finance department approved recruitment 15 511 vacancies state

Related Posts