IMPIMP

Sachin Vaze Case : ‘त्या’ प्रकरणाची फाईल अमित शहांकडे, NIA करणार तपास, ठाकरे सरकारच्या अडचणी वाढणार ?

by pranjalishirish
mukesh ambani security scare nia likely take over investigation mansukh hiren Sachin Vaze case

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेली स्कॉर्पिओ सापडल्यानंतर या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस दलातील सीआययूचे प्रमुख सचिन वाझे Sachin Vaze करीत होते. यानंतर या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला. एनआयएने केलेल्या तपासात वाझे यांची भूमिका संशयास्पद आढळून आल्याने सचिन वाझे यांची 13 तास चौकशी करण्यात आली. यानंतर त्यांना अटक करण्यात आली. वाझे यांना अटक केल्यानंतर विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. सध्या वाझे हे एनआयएच्या कोठडीत असून या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत.

अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेली गाडी प्रकरणाचा तपास सचिन वाझे करत होते. विरोधकांनी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझे Sachin Vaze  यांची पाठराखण केली. मात्र एनआयएने सचिन वाझे यांच्यावर केलेल्या अटकेच्या कारवाईनंतर विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला घेरलं. सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर ठाकरे सरकारला धक्का बसला असताना आता आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.

अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकानं भरलेली गाडी सापडल्यानंतर गाडी मालक मनसुख हिरेन यांचा काही दिवसांनी संशयास्पद मृत्यू झाला. स्फोटकाने भरलेल्या गाडीचा तपास सध्या एनआयए करत असून या प्रकरणाशी मनसुख हिरेन यांचा संबंध असल्याने त्यांच्या मृत्यूचा तपास स्वत:कडे घेण्याच्या हालचाली एनआयएने सुरु केल्या आहेत. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या गृह मंत्रालयाकडून घेण्याचे काम सुरु आहे. असे वृत्त एका वृत्तवाहीनीने दिले आहे.

मनसुख हिरेन यांच्या खूनाची केस थेट एनआयएला हाती घेण्याचा अधिकार नाही. मात्र, अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली गाडी मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. त्यामुळे एनआयएने हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास स्वत:कडे घेण्याची तयारी सुरु केली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास करण्याची परवानगी दिल्यानंतर एनआयए तपास सुरु करेल. यासाठी गृह मंत्रालयाला ठाकरे सरकारच्या परवानगीची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कार पाठोपाठ आणखी एका प्रकरणाचा तपास एनआयएच्या हाती जाणार आहे. त्यामुळे ठाकरे सरकारसमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Also Read :

भाजप खासदाराचा संशयास्पद मृत्यू, आत्महत्या केल्याचा संशय

Related Posts