IMPIMP

सोलापूर : स्थायी समितीच निलंबित, महापालिका वर्तुळात खळबळ

by bali123
municipal corporation standing committee has been suspended by the order of thackeray government

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाईन – Solapur | महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून वाद निर्माण झाल्याने राज्य शासनाने संपूर्ण स्थायी समितीच निलंबित केली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे गेल्या 3 वर्षापासून रखडलेल्या या समितीचे भवितव्य पुन्हा लांबणीवर पडले आहे. यामुळे सोलापूर Solapur महापालिकेत खळबळ उडाली आहे.

महापालिकेतील स्थायी आणि परिवहन समितीच्या सदस्यांची काही दिवसापूर्वी निवड झाली होती. त्यानंतर त्या दोन्ही समितीच्या अध्यक्षपदासाठी 5 मार्च रोजी निवडणूक होणार होती. मात्र, एमआयएमच्या गटनेतेपदाच्या वादामुळे गतवेळी निवडणूक स्थगित झाली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार 15 मार्च रोजी ही निवडणूक होणार होती. मात्र निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आणि राज्य शासनाने स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आलेल्या सर्व सभासदांचेच निलंबन केले. त्यामुळे स्थायी आणि परिवहन समितीच्या सभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया रद्द झाली आहे. हे निलंबन करताना शासनाने म्हटले आहे की, दोन्ही समितीतील सदस्यांच्या निवडी या महापालिका अधिनियम 1949 च्या कलम 31-अ च्या तरतुदींशी विसंगत आहे. त्यामुळे महापालिकेचा ठराव रद्द करण्यात येत असल्याचे राज्यशासनाने आपल्या आदेशात म्हटले आहे. मात्र, असे असले तरी ज्या सदस्यांना या निर्णयाबाबत काही हरकती असल्यास त्यांनी आपल्या हरकती 30 दिवसांपर्यंत नोंदवू शकत असल्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे.

‘कोरोनाचं महाराष्ट्रावर की सरकारचे कोरोनावर प्रेम?’, मनसेचा खोचक सवाल

Mumbai : पोलीस आयुक्त पदासाठी ‘ही’ नावे चर्चेत, CP परमबीर सिंग यांना सचिन वाझे प्रकरण भोवणार?

पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांचा राजीनामा

ED ची मोठी कारवाई ! सुशिलकुमार शिंदेची मुलगी, जावयाची कोट्यावधीची मालमत्ता जप्त

Zomato डिलिव्हरी बॉयच्या तक्रारीनंतर ‘त्या’ तरुणीविरोधातच FIR

Related Posts