IMPIMP

राज्यपाल भाजपचे कार्यकर्ते अन् राजभवन पक्षाचं ऑफिस झालंय का ?

by sikandershaikh
Nana Patole | so the governor s speech was partially discarded Nana Patole s sensational claim

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन  – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भूमिका राज्याला माहिती आहे. राज्यपाल हे भाजपचे कार्यकर्ता आणि राजभवन हे त्यांच्या पक्षाचे कार्यालय आहे का? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. राज्यपाल 12 आमदारांबाबत बोलायला तयार नाहीत. मात्र, त्यांना विधानसभा अध्यक्षपदाची फार घाई झाली आहे. राज्यपालांनी अगोदर 12 आमदारांची नियुक्ती कधी करणार हे सांगावे. राहिला प्रश्न विधानसभा अध्यक्षपदाचा तर अधिवेशनात मतदानाने ही प्रक्रिया होणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) नागपुरात माध्यमांशी बोलत होते. यावेळी पटोले यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, सत्यता पुढे येत नाही तोपर्यंत अधिक बोलणे योग्य नाही. मात्र, याप्रकरणी भाजपला फार घाई झाली आहे. अभिनेता सुशांतसिंह प्रकरणी राज्य सरकार खुनी असल्याचे चित्र भाजपने तयार केले होते. मात्र, आता हे प्रकरण सीबीआयकडे असून त्यात भाजपच्या मोठ्या नेत्याचे नाव समोर येत आहे.
त्यामुळे आता भाजपचे नेते गप्प बसल्याची टीकाही त्यांनी केली. दरम्यान अध्यक्षपद कधी करणार? हा अधिकार घटनेने राज्यपालांना दिला आहे.
अधिवेशनाची सुरुवात आणि स्थगित हे राज्यपाल करत असतात. अध्यक्षपदाच्या निवडीची काहीच हालचाल दिसत नाही.
त्यामुळे राज्याचे हाल होऊ नये यासाठी त्यांनी विचारणा केल्याची प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नाना पटोलेंनी केलेल्या विधानावर दिली आहे.

नागपूर, अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढले, काळजी घेण्याचे आवाहन

Related Posts