IMPIMP

Nana Patole | भाजपला गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात दंगलीची प्रयोगशाळा करायची आहे का?, नाना पटोलेंचा संतप्त सवाल

by nagesh
Nana Patole | reply from congress state president nana patole on shivsena leader chandrakant khaires claim that 22 congress mlas are ready for fadnavis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन अमरावती शहरातील (Amravati Violence) परिस्थिती शांत झाली असताना भाजपकडून (BJP) जाणीवपूर्वक चिथावणी दिली जात आहे. भाजप राजकीय स्वार्थासाठी दंगली (Riot) भडकावून स्वत:ची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपला गुजरातप्रमाणे (Gujarat) महाराष्ट्रात दंगलीची प्रयोगशाळा करायची आहे का? असा संतप्त सवाल काँग्रेसचे (Congress) नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. भाजप नेत्यांची सत्ता गेल्यापासूनचे वागणे विरोधी पक्षासारखे नाही महाराष्ट्रविरोधी पक्षासारखे आहे, असा आरोपही नाना पटोले (Nana Patole) यांनी केला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, नांदेड, मालेगाव आणि अमरावती शहरात झालेला प्रकार हा चिंतेचा विषय आहे. राज्य सरकारने (Maharashtra Government) वेळीच परिस्थिती आटोक्यात आणली आहे. मात्र, भाजपकडून परिस्थिती चिघळवून धार्मिक विद्वेष कसा पसरवता येईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वास्तविक पाहता महाराष्ट्र (Maharashtra) शांत रहावा यासाठी एक जबाबदार विरोधी पक्ष (Opposition) म्हणून भाजपने पुढाकार घेतला पाहिजे. मात्र त्यांचे नेते प्रक्षोभक वक्तव्ये करुन आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत, असे पटोले म्हणाले.

गुजरातमध्ये गोध्रा दंगलीसारखे (Gujarat Godhra riots) प्रयोग करुन देशभर त्याचे लोण पसरवण्याचे काम भाजपने केले.
आता त्यांच्याकडून महाराष्ट्राला दंगलीची प्रयोगशाळा करुन राजकीय स्वार्थ साधायचा प्रयत्न केला जात आहे.
उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत (Uttar Pradesh elections) फायदा मिळवण्यासाठी महाराष्ट्रात आग लावण्याचा धंदा काही नेत्यांकडून सुरु असल्याचा आरोप पटोले यांनी केला.
मात्र, महाराष्ट्राची सुज्ञ आणि समंजस जनता त्यांच्या कुटील कारस्थानांना बळी पडणार नसल्याचे पटोले (Nana Patole) यांनी म्हटले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title : Nana Patole | does bjp want make maharashtra factory of riots like gujarat congress leader nana patole marathi news

हे देखील वाचा :

Multibagger Stock | कृषी संबंधीत ‘या’ कंपनीच्या शेयरने 1 वर्षात 1 लाखाचे बनवले 3.14 कोटी रुपये

WhatsApp Privacy | व्हॉट्सअ‍ॅपनं आणले जबरदस्त फीचर ! सिलेक्टेड लोकांनाच दिसणार तुमचा प्रोफाइल फोटो; जाणून घ्या

R. Ashwin | T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये आर.अश्विनचे स्थान पक्के, ‘या’ दिग्गजानं दिली माहिती

Related Posts