सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) – Nana Patole | राम मंदिर (Ram Mandir, Ayodhya) साठी जमा केलेला निधी कोणी डान्स बार किंवा बियर बारमध्ये उडवत असेल तर त्याचा हिशोब मागितलाच पाहिजे असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. मी 30 वर्षांपूर्वी राम मंदिराला निधी दिला त्याचं काय झालं? हे विचारण्याचा अधिकार मला आहे असंही ते यावेळी बोलताना म्हणाले.
दरम्यान काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या एका नेत्यानंही राम मंदिराच्या नावावर जमा केलेल्या निधीचा उपयोग दारू पिण्यासाठी केल्याचा धक्कादायक आरोप केला होता. याचा एक व्हिडीओ देखील समोर आला होता जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
कांग्रेस विधायक कांतिलाल भूरिया ने कहा कि राम मंदिर के लिए चंदा वसूलने वाले दिन में चंदा वसूलते हैं और उससे रात को दारू पीते हैं#RamMandirNidhiSamarpan #kantilalbhuriya#RamMandirRashtraMandir @INCMP @INCIndia @BJP4MP @BJP4India pic.twitter.com/TpclKNb2b7
— Makarand Kale (@makarandkale) February 2, 2021
नेमका आरोप काय ?
कांतीलाल भूरिया हे मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते आहेत. ते युपीए 2 सरकारच्या राजवटीत केंद्रीय मंत्री होते. तसंच ते झाबुआमधून 5 वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत. एका कार्यक्रमात बोलताना भूरिया म्हणाले होते की, भाजप नेते राम मंदिराच्या नावाखाली लोकांकडून निधी गोळा करतात आणि रात्री याच पैशांमधून दारू पितात. त्यांच्या या आरोपांचा व्हिडीओ सोशलवर तुफान व्हायरल झाला आहे.
‘या’ मॉडेलमुळं मोडला होता सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचा 13 वर्षांचा संसार ! वाचून बसेल धक्का
…म्हणून मुख्यमंत्र्यांनी नाही घेतली ‘कोरोना’ लस !
Pooja Chavan Suicide Case : CM उद्धव ठाकरेंनी संजय राठोडांची ‘ती’ विनंती फेटाळली, अखेर दणका दिलाच