IMPIMP

Nana Patole | महाराष्ट्राचा तुकडाही गुजरातला नेऊ देणार नाही, अदानी समूहाच्या निर्णयावरुन पटोलेंचा खणखणीत इशारा

by bali123
nana patole | nana patoles warning will not allow even piece maharashtra be taken gujarat issue mumbai airport

मुंबई न्यूज (Mumbai News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)Nana Patole | छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) व्यवस्थापन करणाऱ्या अदानी एअरपोर्ट होल्डिंग लि. (AAHL) कंपनीचे मुख्यालय मुंबईतून गुजरातला हलवण्याचा निर्णय अदानी समूहाने (Adani Group) घेतला आहे. कंपनीच्या या निर्णयावरुन मनसेने (MNS) इशारा दिल्यानंतर आता काँग्रेसने (Congress) इशारा दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी इशारा देताना थेट मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. गुजारात्यांचा मुंबईवर डोळा असल्याचे पटोले (Nana Patole) यांनी म्हटले आहे. तसेच, अदानी यांच्याविरुद्ध राज्यभर आंदोलाचा इशारा त्यांनी दिला. अदानी यांच्या निर्णयावरुन आता राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या दिल्ली दौऱ्यावर असून ते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेणार आहेत. दिल्ली दौऱ्यावर असताना नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केंद्रातील मोदी सरकार (Modi government) आणि गुजराती उद्योजकांवर निशाणा साधला. अदानी यांच्या निर्णयावरुन नाना पटोले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गुजरात्यांचा मुंबईवर डोळा आहे, मुंबईतील इंस्टीट्यूट गुजरातला नेले जात आहेत. परंतु महाराष्ट्राचा तुकडाही गुजरातला (Gujarat) नेऊ देणार नाही, अशा शब्दात पटोले यांनी मोदी सरकारला खणखणीत इशारा दिला आहे.

मी सामना वाचत नाही

शिवसेनेच्या सामना (Shivsena Samana Paper) या मुखपत्रातील अग्रलेखात काँग्रेस पक्षावर भाष्य करण्यात आले आहे.
काँग्रेस पक्षात डरपोक लोकांना स्थान नाही असे राहुल गांधी म्हणतात ते बरोबर आहे.
यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की, सामना या मुखपत्रावर मी कोणतीही प्रतिक्रिया देत नाही, कारण मी सामना वाचत नाही.
अशा शब्दात पटोलेंनी टोला लगावला आहे.

Web Title : nana patole | nana patoles warning will not allow even piece maharashtra be taken gujarat issue mumbai airport

Related Posts