IMPIMP

Nana Patole | ‘सरकारमध्ये जे चालले आहे त्याला दुरुस्त करण्याची वेळ आली’; सरकार बदलणार की सरकारमध्ये बदल?

by nagesh
 Pune Kasba Peth Bypoll Election | chandrakant patil replied to nana patole statement on kasbapeth byelection

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनराज्यातील सरकार (State Government) 10 मार्चला बदलणार, असे भाकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांनी केले आहे. त्यानंतर आता काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी, 10 मार्चनंतर राज्य सरकारमध्ये मोठे बदल पहायला मिळतील, असे विधान केले आहे. नाना पटोले (Nana Patole) यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

राज्यात सत्ता बदलाचे भाकीत चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीही केले होते, परंतु तसे काहीही झाले नाही. त्यामुळे त्यांचे विधान गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याची प्रतिक्रीया आघाडीच्या नेत्यांनी दिली होती. 10 मार्चला उत्तर प्रदेशसह (Uttar Pradesh) पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल (Assembly Election Results) लागणार आहे. याला जोडून चंद्रकांत पाटील यांच्या विधानाकडे पाहिले जात आहे. नाना पटोले (Nana Patole) यांनी काल भंडारा (Bhandara) येथे पत्रकारांशी बोलताना, सरकारमध्ये जे चालले आहे त्यालाही दुरुस्त करण्याची वेळ आली असल्याचे सूचक विधान त्यांनी केले.

सरकारमध्ये काँग्रेसचे 12 मंत्री आहेत. सध्या पाच राज्यांची निवडणूक सुरु असून माझे सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासोबत बोलणे झाले आहे.
10 मार्चपर्यंत संधी द्या. आपल्या सरकारमध्ये जे काही चालले आहे, ते दुरुस्त करण्याची वेळ आपल्या हाती असल्याचे पटोले यांनी सांगितले.
पटोले यांच्या विधानामुळे आता काँग्रेसच्या काही मंत्र्यांना डच्चू देऊन नव्यांना संधी मिळणार का, मंत्र्यांपैकीच कोणाला विधानसभा अध्यक्षपदाची (Assembly Speaker) संधी मिळणार का ? अशी चर्चा सुरु झाली आहे.
नाना पटोले हे स्वत: प्रदेशाध्यक्ष असून त्यांनी मंत्री होण्यासही इच्छुक असल्याचे म्हटले जाते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

नाना पटोले पुढे म्हणाले, सरकार पाडण्याचे दावे फुसके असून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) एकसंघ असून मजबूत सरकार आहे.
भाजपच्या दबावतंत्रामुळे हे सरकार कधीही पडणार नाही.
भाजपच्या केंद्राच्या दडपशाहीचा आम्ही एकजुटीने प्रतिकार करु.
त्यांना कितीही तारखा देऊ देत सरकार मजबूत असल्याचे पटोले म्हणाले.

Web Title :- Nana Patole | will the government change or cabinet reshuffle nana patoles statement on chandrakant patils claim

हे देखील वाचा :

Breakfast Tips | सकाळी उठून नाश्त्यात खा ‘या’ 2 गोष्टी, होतील जबरदस्त लाभ, अनेक आजार राहतील दूर

देशातील ‘या’ 7 मार्गावरून धावणार हाय स्पीड Bullet Train, रेल्वे मंत्रालयाने दिली माहिती, जाणून घ्या रूट

Pune Crime | सरकारकडून शैक्षणिक फीचे पैसे परत मिळवून देण्याचे आमिष दाखवून 250 हून अधिक जणांची फसवणूक; तिरुपती कॉर्पोरेशनच्या विकास बांदल, कॅशियर विलास पाटीलवर गुन्हा दाखल

Bombay High Court | कायदेशीरदृष्ट्या पहिला विवाह समाप्त केल्याशिवाय दुसर्‍या पत्नीला पतीच्या पेन्शनचा हक्क नाही, मुंबई हायकोर्टाचा निर्णय

Related Posts