IMPIMP

Video : ‘सामनाचा ‘सामना’ कसा करायचा ते पुढे ठरवू’, नाना पटोलेंचे सूचक विधान

by nagesh
nana patoles big statement about sanjay raut and shivsena samana editorial

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनराज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. मात्र आता सत्ताधाऱ्यांमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे पहायला मिळत आहे. काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सामनाचा सामना पुढे कसा करायचा हे ठरवू असे सूचक विधान करत शिवसेनेला टोला लगावला आहे. सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेस नेत्यांना खडेबोल सुनावण्यात आले आहेत. त्यावर बोलताना पटोले यांनी सूचक विधान करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

‘महाराष्ट्र मॉडेलचा वापर करा, अन्यथा देशातील कोरोना कंट्रोलमध्ये येणार नाही’

नाना पटोले Nana Patole म्हणाले, शिवसेनेच्या सामनामध्ये काय लिहिले आहे, ते बघून सामनाचा सामना पुढे कसा करायचा ते योग्य प्रकारे ठरवू, असा टोला त्यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता लगावला. तसेच भाजपचे आमदार आशिष शेलार, जेपी नड्डा यांनी गांधी परिवारावर टीका केली. 70 वर्षात काँग्रेसने काय केले. काँग्रेसने देश निर्माण केला आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:चे घर उभे करत आहेत, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

मर्डर केसमध्ये ऑलिम्पिक मेडल विजेता सुशील कुमारचे नाव आले समोर, पोलिसांकडून कुस्तीपटूच्या घरावर छापा

केंद्र सरकारवर टीका करताना नाना पटोले Nana Patole म्हणाले, लोकांना वाचवण्यापेक्षा लोकांना संपवण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. केंद्र सरकारने लशीबाबत खोटी माहिती कोर्टात सादर केली आहे, अशी टीका त्यांनी केली. कोर्टाच्या आदेशाने पदोन्नती रद्द झाली. यावर आम्ही पक्ष म्हणून नंतर बोलू आता लोकांचे जीव वाचणे, कोरोना विषय महत्त्वाचा आहे. लॉकडाऊन कालावधी वाढत असेल तर हातवार पोट असणाऱ्या लोकांची व्यवस्था सरकारने केली पाहिजे, मग लॉकडाऊन वाढवण्याची भूमिका घेतली पाहिजे, असा सल्ला नाना पटोले यांनी दिला.

काय लिहिलंय सामनात ?
राज्यातील काँग्रेसचे पुढारी सामना वाचत नसल्याचा टेंभा मिरवतात हा त्यांचा प्रश्न, पण सोनिया गांधी सामनाची दखल घेतात, हे काल पुन्हा एकदा दिसून आले. काँग्रेसला आसाम, केरळमध्ये चांगली लढत हेऊनही सत्तेवर का येता आले नाही ? हा प्रश्न सामनाने याच स्तंभातून विचारला. नेमका काँग्रेस कार्य समितीत सोनिया गांधी यांनी हाच मुद्दा उपस्थित केला. केरळ, आसाममधील पराभव त्यांना टोचला व त्यांनी त्याबाबत प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्रातील जुन्या जाणत्या काँग्रेस पुढाऱ्यांनीही सामना वाचून सोनियापर्यंत लोकभावना पोहोचवल्या असतील तर चांगलेच आहे, असे म्हणत सेनेनं काँग्रेसला टोला लगावला.

Also Read :

भाजपकडून माजी खा. संजय काकडे यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती

ठाकरे सरकारची वचनपूर्ती, 9 लाख नोंदणीकृत कामगारांच्या खात्यात 137.61 कोटी रुपये जमा

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंना पंतप्रधानांनी वेळ का दिली नाही?, शिवसेनेचा ‘सामना’तुन सवाल

मर्डर केसमध्ये ऑलिम्पिक मेडल विजेता सुशील कुमारचे नाव आले समोर, पोलिसांकडून कुस्तीपटूच्या घरावर छापा

Related Posts