IMPIMP

भाजपच्या ‘या’ नेत्याने सहकुटुंब घेतली शरद पवारांची रुग्णालयात भेट

by pranjalishirish
narayan rane family visited pawar went hospital and questioned him

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांना पोटदुखीचा त्रास होत असल्याने सध्या ते मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयी अनेकांनी विचारपूस केली. काहींनी फोन करून तर काहींना प्रत्यक्ष भेटून माहिती घेतली. त्यानंतर आता भाजपचे खासदार नारायण राणे यांनी सहकुटुंब रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली.

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले..

पोटदुखीचा त्रास होत असल्याने शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच त्यांना पित्ताशयाचा त्रास होत असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर अनेकांनी त्यांची विचारपूस केली. त्यामध्ये नारायण राणे यांनी पत्नी नीलम आणि पुत्र आमदार नितेश राणे यांच्यासह पवारांची Sharad Pawar  भेट घेतली. नारायण राणे आणि शरद पवार यांचे घनिष्ठ संबंध असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. तसेच नारायण राणे यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जाते. मात्र, ते शरद पवार यांच्यावर टीका करणार नाही, असे ते जाहीरपणे सांगतात.

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

दरम्यान, शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्याचे समजल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेकांनी विचारपूस केली.

‘केवळ RSS वाले तेवढे देशभक्त आणि बाकी सगळे देशद्रोही बनलेत’

पवारांच्या प्रकृतीविषयी माहिती देणारे सुप्रिया सुळेंचे ट्विट

शरद पवार Sharad Pawar  यांची प्रकृती स्थिर असून, ते त्यांचे रोजचे आवडते काम करत आहेत, असे ट्विट करत सुप्रिया सुळे यांनी म्हटले, की ‘सुप्रभात, ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारीका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार. ही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय शरद पवार साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थात वर्तमानपत्रांचं वाचन, करीत आहेत’.

Also Read:

Kerala election : भाजपने 5 वर्षांपूर्वी उघडलेले खाते ‘या’ वर्षी आम्ही बंद करणार; ‘या’ नेत्याची जोरदार टीका

MPSC परीक्षेतून होणारा भाजपचा प्रचार थांबवा : यशोमती ठाकूर

पवार-शहा भेटीबद्दल प्रफुल्ल पटेल यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले – ‘भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येणार नाही, राज्य सरकार स्थिर’

इंदुरीकर महाराजांना मोठा दिलासा ! न्यायालयानं रद्द केला ‘तो’ खटला

1 एप्रिलपासून कामाचे तास, वेतन बदलणार; जाणून घ्या सरकारचा प्लॅन

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

पवार-शाह गुप्त बैठक ! ‘चंद्रकांत पाटील वगैरे नेते पतंगाच्या मांजावरून एवढे वर गेले की… “

‘जितेंद्र आव्हाड यांचे CDR आणि SDR जतन करा’, हायकोर्टाचे पोलिसांचा आदेश

लष्कर पेपर लिक प्रकरण : मेजर थिरु थंगवेल याला 25 लाख रुपयांच्या बदल्यात लष्कराचा पेपर पाठविला

‘आधी बुडणार्‍या रोजगाराचे पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा करा, नंतरच Lockdown लावा’

Related Posts