IMPIMP

Narayan Rane | जामिनावर सुटका झाल्यानंतर नारायण राणेंनी ट्विट करून दोनच शब्दात दिली प्रतिक्रिया

by nagesh
Narayan Rane | sindhudurg district bank election bjp leader and union minister narayan rane criticizes shivsena

रायगड : सरकारसत्ता ऑनलाइन  केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत (CM Uddhav Thackeray) आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना महाड न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर (Mahad Court) हजर करण्यात आली. रात्री १० वाजता न्यायालयात युक्तिवाद करताना पोलिसांनी राणे यांची सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर राणे (Narayan Rane) यांचा जामीन मंजूर केला. जामिनावर सुटका मुक्त झाल्यानंतर काही तासात राणेंनी केवळ दोनच शब्दात पहिलं ट्वीट केलं आहे. रात्री १२.३२ वाजण्याच्या सुमारास ‘सत्यमेव जयते’ असं दोन शब्दांचं ट्वीट केलं आहे. दरम्यान, राणेंचे सुपुत्र भाजप आमदार नितेश राणे यांनी अभिनेता मनोज वाजपेयीच्या एका सिनेमातील सीन शेअर करत अप्रत्यक्षपणे शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

गोळवलीमध्ये नारायण राणे यांना अटक केल्यानंतर महाड इथं आणण्यात आले. त्यानंतर महाड न्यायदंडाधिकारी बाबासाहेब पाटील यांच्यासमोर
सुनावणी पार पडली. सुनावणीवेळी राणे यांचे कुटुंबीय सुद्धा न्यायालयात हजर होते. यावेळी पोलिसांनी राणे यांची सात दिवसांची पोलीस कोठडीची
मागणी केली. परंतु, नारायण राणे यांचे वय आणि प्रकृती ठीक नसल्याने त्यांना जामीन मिळावा असा युक्तिवाद वकील अनिकेत निकम आणि भाऊ साळुंके यांनी केला.

वकिलांनी न्यायालयाला राणेंना मधुमेह, उच्चरक्तदाबाचा त्रास आहे, यावर त्यांची औषध सुरू आहे, अशी माहिती देण्यात आली. तसेच अटक करण्यापूर्वी कोणतीही नोटीस देण्यात आली नसल्याचे राणेंच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं.

Web Title : narayan rane first tweet as soon as he was released on bail

हे देखील वाचा :

Pune Crime | निवृत्त पोलीस निरीक्षकाच्या कुटुंबावर 1.20 कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Pune Police Inspector Transfer | पुण्यात 3 पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या

Narayan Rane | ‘या’ अटीखाली नारायण राणे यांना मिळाला जामीन, जाणून घ्या

Related Posts