IMPIMP

Narayan Rane on CM Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद कसं मिळालं? ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं, नारायण राणेंनी केला गौप्यस्फोट

by nagesh
Narayan Rane on CM Uddhav Thackeray | how did uddhav thackeray get chief ministers post what happened night narayan ranes big claim

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  शिवसेनेच्या दरऱ्या मेळाव्यातील (shivsena dasara melava) उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर राज्यातील राजकारण पुन्हा पेटले आहे. उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यामध्ये जुगलबंदी (Narayan Rane on CM Uddhav Thackeray) रंगण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात भाजपवर (BJP) घणाघाती टीका केल्यानंतर आता नारायण राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर (Narayan Rane on CM Uddhav Thackeray) दिले आहे. तसेच शिवसैनिकाला मुख्यमंत्री (CM) करण्याची भाषा करणारे उद्धव ठाकरे अचानक मुख्यमंत्री कसे झाले, यासंदर्भात राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे नव्हते. तर मीच त्यांचा हात उंचावून ते मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केल्याचा दावा राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला होता. दरम्यान, नारायण राणे ((Narayan Rane) यांनी वेगळाच दावा (Narayan Rane on CM Uddhav Thackeray) केला आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे होते. मुख्यमंत्रिपदासाठी आपल्या नावाची घोषणा करावी, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याकडे केली होती, असा दावा राणे यांनी केला आहे.

नारायण राणे यांनी म्हटले, उद्धव ठाकरे सांगतात मला शरद पवार यांनी मुख्यमंत्री केले. कसे केले हे आम्हाला माहिती आहे. शिवसैनिक त्याचे साक्षीदार आहेत. संजय राऊत जी (Sanjay Raut), मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होण्याच्या आदल्या रात्री आपण उद्धव ठाकरे आणि आदित्य (Aditya Thackeray) यांना घेऊन शरद पवारांच्या घरी पोहोचलात. त्यावेळी तुमच्यासोबत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) किंवा इतर कोणताही शिवसैनिक नव्हता. तुम्ही तिघे शरद पवार यांना भेटल्यानंतर त्यांना विनंती केली की, साहेब, आम्हाला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचे होते, पण काही करणामुळे ते शक्य नाही. आता मलाच मुख्यमंत्री करा, अशी विनंती करायला आलो आहोत. याला राऊत यांनी दुजोरा दिला. त्यानंतर शरद पवार साहेब म्हणाले, ‘वा! हे उत्तमच झाले!’ मी उद्याच्या बैठकीत हे जाहीर करतो. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी शरद पवार यांनी आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव (Narayan Rane on CM Uddhav Thackeray) जाहीर केले.

यावेळी बाळासाहेबांसोबत असलेल्या उद्धव ठाकरेंच्या संबंधावरुनही नारायण राणे यांनी टीका केली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

उद्धव ठाकरे यांनी काय काय थापा मारल्या. साहेबांना दिलेलं वचन पूर्ण केलं म्हणून सांगतात.
मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करीन, हा शब्द तुम्ही साहेबांना दिला. पण स्वत:च मुख्यमंत्री झालात.
यापुढे ते शक्यच नाही. पण, भविष्यात चुकून संधी मिळाली, तर हे ठाकरे सोडून कोणालाच मुख्यमंत्री करु शकत नाहीत, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
साहेबांनी घातलेली शपथ मोडून दोनदा घर सोडून हॉटेल हॉलिडे इन (Hotel Holiday Inn) मध्ये राहायला गेलेले साहेबांचा शब्द काय पाळणार? असा सवाल राणेंनी केला.

शिवसैनिकांना कदाचित ही बनवाबनवी समजणार नाही.
पण माझ्यासारखे अनेक लोक या इतिहासाचे साक्षीदार आहेत.
त्यावेळी मी मध्यस्थी केली नसती, तर आता आपण कुठे असता? साहेबांच्या हयातीत जे पुत्रकर्तव्यास जागले नाहीत,
ते साहेब गेल्यानंतर कसे काय पुत्रकर्तव्यास जागणार संजय राऊतजी? असाही सवाल राणेंनी विचारला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title: Narayan Rane on CM Uddhav Thackeray | how did uddhav thackeray get chief ministers post what happened night narayan ranes big claim

हे देखील वाचा :

Corona vaccination in India | भारताचा ऐतिहासिक विक्रम ! कोरोना लसीकरणाचा 100 कोटींचा टप्पा पार

Money Laundering Case | जॅकलीन फर्नांडिसला 3 वेळा ED कडून समन्स; अभिनेत्रीनं चौथ्यावेळी दिलं स्पष्टीकरण

Quickly Earn Money | 10 हजार रूपये लावून सुरू करू शकता ‘हा’ व्यवसाय, दरमहा होईल 1 लाखापेक्षा जास्त कमाई; जाणून घ्या कशी?

Related Posts