IMPIMP

Narayan Rane | केंद्रीय मंत्री राणेंच्या वाहनावरील चालकाचा मृत्यू, कुटुंबियांनी केला गंभीर आरोप

by nagesh
Narayan Rane | Union minister and bjp leader narayan rane will run in the high court to avoid action on the adhish bungalow

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या गाडीवरील चालकाचा (Driver) हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर चालकाच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केले आहेत. वैद्यकीय सुट्टीवर असताना निलंबित करण्याची धमकी देऊन कमावर बोलावल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यानंतर पोलिसांनी आता याप्रकरणी चौकशी सुरु केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अशोक कुमार वर्मा (Ashok Kumar Verma) असं हृदयविकाराच्या झटक्याने (heart attack) मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. ते उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) राज्य स्थावर विभागात चालक म्हणून कार्यरत होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या लौखनौ दोऱ्यावर त्यांची ड्यूटी लावण्यात आली होती. ते वैद्यकीय रजेवर (medical leave) असताना त्यांना ड्यूटीवर बोलवण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

याप्रकरणी अशोक वर्मा यांच्या कुटुंबियांनी (Family) संबंधित अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे लखनौ (Lucknow) दोऱ्यावर असताना अशोक कुमार यांची ड्युटी लावण्यात आली होती. ड्यूटीवर असताना अशोक कुमार यांना हृदयविकाराचा झटका आला.
त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
परंतु रुग्णालयात पोहचेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
त्यांच्या निधनानंतर कुटुंबियांनी गंभीर आरोप केले आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पोलीस अधिकारी राघवेंद्र मिश्र (Police Officer Raghavendra Mishra) म्हणाले की, अशोक कुमार वर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.
कुटुंबाने हत्येचा आरोप केला असून तक्रार दिली आहे.
या प्रकरणाचा तपास करुन पुढील कारवाई केली जात आहे.
मृतदेह पोस्टमार्टमसाठी (Postmortem) पाठवण्यात आला आहे.
कारण काहीही असो, त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.

कुटुंबियांनी आरोप केला आहे की, मागील काही दिवसांपासून अशोक कुमार यांची प्रकृती खराब होती. त्यामुळे ते वैद्यकीय रजेवर होते.
पण केंद्रीय मंत्री नारायण राणे आल्यानंतर त्यांची रजा रद्द करण्यात आली.
वैद्यकीय सुट्टीवर असतानाही त्यांना निलंबित करण्याची धमकी देऊन ड्युटीवर बोलवण्यात आलं.
स्थावर विभागातील अधिकारी अमरीश श्रीवास्तव (Amrish Srivastava) यांना अकोक कुमार यांच्या प्रकृतीविषयी माहिती होते.
त्यानंतरही कामावर हजर राहण्यास सांगितले.
याशिवाय त्यांनी निलंबित करण्याची धमकी दिली होती.
त्यामुळे अशोक कुमार कामावर गेले होते, असा आरोप कुटुंबियांनी केला आहे.

Web Title : Narayan Rane | union minister narayan rane duty driver ashok verma died heart attack in lucknow

हे देखील वाचा :

Ratan Tata | लग्नपत्रिका छापण्यापूर्वीच मोडला होता रतन टाटा यांचा साखरपुडा, जाणून घ्या पूर्ण किस्सा

Pune Corporation | पुणे महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीवर सर्व पक्षीय सदस्यांचा बहिष्कार ! जाणून घ्या प्रकरण

ACB Police Inspector Transfer | अ‍ॅन्टी करप्शन विभागातील 34 अधिकार्‍यांच्या अंतर्गत बदल्या अन् नियुक्त्या

Related Posts