IMPIMP

Narendra Patil : ‘शरद पवार आणि अजित पवारांपेक्षा सध्या देवेंद्र फडणवीस Powerful !’

by pranjalishirish
narendra patil said Devendra fadnavis more powerful leader than sharad pawar and ajit pawar

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) या दोघांच्याही तुलनेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची काम करण्याची पद्धत वेगळी आणि लोकप्रिय असल्याचं पहायला मिळत आहे असं वक्तव्य अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी केलं आहे. सोलापुरात ते बोलताना असताना त्यांनी याबाबत भाष्य केलं. शरद पवार आणि अजित पवार दोघांच्याही नेतृत्वाखाली मी खूप वर्षे काम केलं आहे. फडणवीस त्यांच्या तुलनेत खूप वेगळ्या पद्धतीनं काम करतात. त्यांनी पक्ष, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांपेक्षाही कायम सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. दोन्ही पवारांच्या तुलनेत त्यांची लोकप्रियता जास्त असून कामाची पद्धत वेगळी आहे असंही ते म्हणाले.

IND vs ENG : ‘या’ 5 कारणांमुळे टीम इंडियाने कालचा सामना जिंकला

‘फडणवीसांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले’

नरेंद्र पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्या पक्षातील लोकांना मोठं करण्यास प्राधान्य दिलं आहे. परंतु फडणवीसांनी Devendra Fadnavis  सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले. मनसुख हिरेन या गरिबाची हत्या झाली. विशेष म्हणजे त्यांच्या बद्दल अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा सुरू असताना त्यांच्या खून होतो, हा विषय खूपच गंभीर आहे. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांना कागदपत्रे मिळाली नाही. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी कागदपत्रे मिळवली.

केंद्राच्या नावाने बोटे मोडणार्‍यांनी ‘हे’ आवर्जून वाचलं पाहिजे’

‘आजही प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर फडणवीस यांचा वचक, त्यांची लोकप्रियता कायम’

पुढं बोलताना पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस  Devendra Fadnavis यांनी सर्व प्रकार समोर आणला. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, आजही प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर फडणवीस यांचा वचक आहे. त्यांची लोकप्रियता कायम आहे. त्यांच्या माध्यमातून निश्चितपणे सचिन वाझे, मनसुख हिरेन, दरमहा 100 कोटींची मागणी या सर्व प्रकरणांची वस्तुस्थिती जनतेसमोर काही दिवसात येईल असा दावाही त्यांनी केला.

Aslo Read : 

‘पुन्हा येण्यात अनेकदा अपयश येऊनही प्रयत्न न सोडण्याची त्यांची जिद्द बघता कौतुक करावंसं वाटतं !’

महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटीविषयी राष्ट्रवादीच्या नेत्याचे मोठं वक्तव्य; म्हणाले…

प्रसिद्ध कृष्णा म्हणाला – ‘मला भागीदारी तोडणारा गोलंदाज व्हायचे आहे’

फोन टॅपिंग करण्याचा अधिकार फडणवीसांना दिला कोणी; जयंत पाटलांचा सवाल

‘देवेंद्र फडणवीस हे अहंकारी आणि लबाड, माझ्याकडे त्यांच्या प्रकरणांचा गठ्ठा !’

आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्या प्रकरण : देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाजवळ आंदोलन, पुतळा जाळला

Gold Price Today : सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण; जाणून घ्या पुणे-मुंबईतील आजचा भाव

घरचा आहेर देत ठाकरे सरकारमधील मंत्र्यानंच केलं ‘असं’ आवाहन, म्हणाले – ‘… तर अजित पवारांच्या घरावर मोर्चा काढा’

‘आर्किटेक्ट’ एकनाथ निमगडे हत्या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचा अप्रत्यक्ष सहभाग, नागपुरात राष्ट्रवादीकडून आंदोलन

‘भाई जगताप असा टपोरी ज्याला ‘भाई’ बनायचं होतं पण… ; निलेश राणेंची टीका

100 कोटी खंडणी वसुलीच्या आरोपांनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि अनिल देशमुख यांची भेट, पुढं काय होणार?

Related Posts