IMPIMP

नाशिक महापालिका निवडणूक ! भाजप नेत्याने घेतली राज ठाकरेंची भेट; चर्चांना उधाण

by amol
MNS raj-thackeray

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) नाशिक महानगरपालिका निवडणूक होत आहे. त्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यातच भाजपचे नाशिक शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय स्तरावर चर्चेचा मुद्दा बनला आहे.

राज ठाकरे (Raj Thackeray) हे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी पक्षातील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. याचदरम्यान गिरीश पालवे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या भेटीमागे मनसेने भाजपला पाठिंबा द्यावा, हे कारण असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नाशिकमध्ये भाजप आणि मनसे या दोन्ही पक्षांतील संबंध दृढ होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीत नाशिकमध्ये मनसे-भाजप युती होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनसेची भाजपला मदत

नाशिक महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत मनसेने भाजपला मदत केली होती. त्यानंतर आता मनसे स्थायी समिती सभापती निवडणुकीतही भाजपला मदत करणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, याचे चित्र येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.

Related Posts