IMPIMP

National Road Safety Board | नितीन गडकरींचा मोठा निर्णय, महाराष्ट्राला होणार फायदाच फायदा; जाणून घ्या

by nagesh
Aurangabad - Pune Expressway Project | Union Minister of Roads and Transport nitin gadkari announces aurangabad to pune express highway project

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय रस्ते सुरक्षा बोर्डाच्या (National Road Safety Board) स्थापनेचा आदेश काढला आहे. रस्ते सुरक्षेबद्दल जनजागृती (Awareness about road safety) करण्यासाठी आणि नवं तंत्रज्ञान अंगिकारण्याची जबाबदारी राष्ट्रीय रस्ते सुरक्षा बोर्डाकडे (National Road Safety Board) असणार आहे. या बोर्डाचे मुख्यालय एनसीआरमध्ये (NCR) असेल. देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये बोर्डाची कार्यालयं असू शकतात. याबद्दलचा निर्णय अद्याप झालेला नाही.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

देशात होणाऱ्या रस्ते अपघातांची (Accident) मोठी संख्या आहे. यामध्ये दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतो. ते टाळण्यासाठी, रस्ते प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी रस्ते सुरक्षा बोर्डाच्या (National Road Safety Board) स्थापनेचा निर्णय घेण्यात आला आहे. तसा आदेश केंद्र सरकारकडून (Central Government) काढण्यात आला आहे. या बोर्डात संचालक आणि तीन सदस्यांचा समावेश असेल. बोर्डातील सदस्यांची किमान संख्या सातपर्यंत असू शकते. या सर्वांची नेमणूक केंद्र सरकार करणार आहे.

या बोर्डाकडे रस्ते सुरक्षा (Road safety), वाहतूक व्यवस्थापन (traffic management), अपघातांचा तपास (accident investigation) करण्याची जबाबदारी असणार आहे. केंद्र सरकार, राज्य सरकारं (state government) आणि स्थानिक यंत्रणांना रस्ते सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापनाबद्दल तांत्रिक सल्ले आणि सहकार्य देण्याचं काम बोर्ड करणार आहे. या बोर्डाला देशाला मोठा फायदा होणार आहे. तसेच महाराष्ट्र (Maharashtra) वेगाने शहरीकरण होणारे राज्य होणार आहे. या बोर्डामुळे रस्ते सुरक्षा आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न जास्त गंभीर आहे. त्यामुळे या बोर्डाचा मोठा फायदा महाराष्ट्राला होणार आहे.

Web Title : National Road Safety Board | Nitin Gadkari’s big decision will only benefit Maharashtra; Find out

हे देखील वाचा :

Aryan Khan Drugs Case | आर्यन खान, अरबाज मर्चंटच्या बाबतीत मॉडलिंग करणार्‍या मूनमूनच्या वकिलांनी केला ‘हा’ मोठा दावा

Indian Oil Recruitment 2021 | इंडियन ऑइलमध्ये तब्बल 513 जागांसाठी होणार भरती; पगार 1.05 लाख रुपयांपर्यंत

Share Market Today | सेन्सेक्स 59700 तर निफ्टी 17800 च्या वर झाला बंद, ONGC मध्ये 10 टक्केपेक्षा जास्त उसळी

Related Posts