IMPIMP

Nawab Malik | ज्ञानदेव वानखेडेंच्या दाव्यावर उद्या सुनावणी; नवाब मलिकांनी उच्च न्यायालयाला केली ‘ही’ विनंती

by nagesh
Nawab Malik | dnyandev wankhede defamation case ncp minister nawab malik trying to file additional documents in mumbai high court

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Nawab Malik | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांनी (Nawab Malik) आरोपांचा सुरसपाटा लावला आहे. मलिकांनी वानखेडे यांच्यावर वैयक्तिक केलेल्या आरोपानंतर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede) यांनी हाय कोर्टात (Mumbai High court) धाव घेतली. आणि कागदपत्रे सादर केली आहेत. मात्र याप्रकरणी उद्या सुनावणी घेण्यात येणार आहे. दरम्यान, त्यावेळी वानखेडे यांच्या बाबात काही अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्याची मुभा मिळावी. अशी विनंती मलिकांच्या वतीने कोर्टात करण्यात आलीय.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

समीर वानखेडे यांनी सरकारी नोकरी मिळवताना घोटाळा केल्याचा आरोप नवाब मलिकांनी (Nawab Malik) केला होता.
त्यांचं कुटुंब मुस्लिम असल्याचं व त्यांच्या वडिलांचं नाव दाऊद वानखेडे असल्याचं मलिक यांनी निदर्शनास आणलं होतं. या आरोपामुळे गोंधळ उडाला होता.
तर, मलिक यांच्या या आरोपांविरोधात समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede) यांनी कोर्टात धाव घेतली.
यावरुन कोर्टात सुनावणी झाली व कोर्टानं दोन्ही पक्षकारांना आपापल्याला म्हणणं सिद्ध करण्यासाठी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते.
त्यावर उद्या (गुरुवारी) सुनावणी होणार आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

दरम्यान, तत्पूर्वी, काही अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्याचा नवाब मलिक यांनी परवानगी मागितली.
तर, ‘समीर वानखेडे यांना मुंबई महापालिकेनं दिलेल्या जन्मदाखल्याची प्रत,
शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र व अन्य कागदपत्रे नवाब मलिक यांना सादर करायची असल्याचं कळते.

Web Title : Nawab Malik | dnyandev wankhede defamation case ncp minister nawab malik trying to file additional documents in mumbai high court

हे देखील वाचा :

Akshara Singh | स्पोर्ट्स ब्रा आणि ब्लॅक शॉट्समध्ये अभिनेत्री अक्षरा सिंहनं केली फ्लॉन्ट फिगर, व्हिडीओ पाहून उडतील होश

Maharashtra Rains | आगामी 5 दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता; ‘या’ 13 जिल्ह्यांना हाय ‘Alert’

Parambir Singh Absconding | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह तिघांना कोर्टानं केलं फरार घोषित

Related Posts