IMPIMP

Nawab Malik | PM मोदींनी 3 कृषी कायदे मागे घेतल्यानंतर नवाब मलिकांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘निवडणुकांतील पराभवाच्या भितीनं…’

by nagesh
Nawab Malik Health | ncp leader nawab malik serious in hospital says lawyer

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Nawab Malik | देशात केंद्र सरकारने (Central Government) आणलेले तीन्ही कृषी कायदे (3 Agricultural laws) रद्द करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज सकाळीच 3 कृषी कायदे पुढील संसदीय अधिवेशना दरम्यान रद्द करण्याची मोठी घोषणा केली आहे. दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेलं शेतकरी आंदोलन शेतकऱ्यांनी थांबवावं आणि शेतात जाऊन काम करावं, एक नवी सुरूवात करावी असं आवाहन पंतप्रधान मोदींंनी केलं आहे. या घोषणेनंतर भारतातून अनेक प्रतिक्रिया येताहेत. यातच राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांनीही (Nawab Malik) प्रतिक्रिया दिली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले, ‘हा शेतकऱ्यांचा आणि शेतकरी आंदोलनाचा विजय आहे, दिल्लीतील या आंदोलनात शेतकऱ्यांनी जीवाची बाजी लावली. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता शेतकऱ्यांनी वर्षभरापासून आपलं आंदोलन सुरूच ठेवलं. या आंदोलनात लोकांनी प्राणाची आहुती दिली, शेतकरी मागे हटले नाही. शेवटी सरकारला कायदा रद्द करावा लागला.’ असं मलिक म्हणाले.

पुढे बोलताना नवाब मलिक म्हणाले, ‘सात वर्षामध्ये पंतप्रधान मोदींनी कधीही पाय मागे घेतला नाही. आता, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील निवडणुका समोर आहेत. त्यामुळेच, पराभवाच्या भीतीने मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे,’ असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

यावेळीही चर्चा करुन हे (कृषी कायदे) कायदे आणले होते. देशातील अनेक शेतकऱ्यांनी याचं स्वागत केलं.
मी आज त्या सर्वांचे आभार मानतो. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आम्ही ३ कायदे आणले.
मात्र इतक्या प्रयत्नानंतरही काही शेतकऱ्यांना आम्ही ही गोष्ट समजावू शकलो नाही.
कदाचित आमच्या प्रयत्नांमध्ये काही उणीव, त्रुटी राहिली असेल. त्यामुळे 3 कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे,
असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी म्हटलं आहे.

Web Title :- Nawab Malik | farmer agitation modi withdraws 3 agriculture laws out fear defeat ncp leader and minister nawab malik

हे देखील वाचा :

Former MLA Mohan Joshi | शेतकऱ्यांच्या लढ्याचा विजय अन् PM मोदींच्या अहंकाराचा पराभव – माजी आमदार मोहन जोशी

IND vs NZ | मुंबईकरांसाठी खुशखबर ! दुसऱ्या टेस्टबाबत ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय; या गोष्टीला दिली परवानगी?

Data Plans For Airtel-Reliance Jio | केवळ 251 रुपयांत प्रीपेड प्लान्समध्ये मिळावा 50 GB डेटा, जाणून घ्या

Related Posts