IMPIMP

Nawab Malik | ‘भाजपच्या एका माजी मंत्र्यानं मंदिराची शेकडो एकर जमीन हडपलीय’; मलिकांचा आणखी एक बाॅम्ब

by nagesh
Nawab Malik Hospitalized | ncp leader nawab malik collapsed in jail hospitalized lawyer informed in court

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  Nawab Malik | राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिकांनी (Nawab Malik) गेल्या काही दिवसांपासून खळबळजनक आरोपांचे सत्र सुरूच केलं आहे. आर्यन खान प्रकरणानंतर मलिकांनी एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि नंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले. यानंतर आता नवाब मलिकांनी भारतीय जनता पार्टीच्या (BJP) एका माजी मंत्र्यावर मंदिराची जमीन हडपल्याचा आरोप केला आहे. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले, ‘भाजपच्या (BJP) एका माजी मंत्र्यानं मंदिराची शेकडो एकर जमीन हडपली आहे.
देवाच्या नावावर दिलेल्या जमिनी ज्यांनी लुटल्या आहेत, त्या सर्वांना तुरुंगात टाकायला हवं. आम्ही कारवाई सुरू केलीच आहे.
पण सक्तवसुली संचालनालयाने (ED) आम्हाला त्यात मदत करावी, अशी अपेक्षा आहे. असे ते म्हणाले.
तसेच, मंदिराची जमीन माजी मंत्र्यानं कशी हडपली? कसे शेकडो कोटी रुपये खाल्ले? याचा देखील भांडाफोड लवकरच करणार असल्याचं मलिक म्हणाले.

पुढे बोलताना मलिक म्हणाले की, ‘एका अधिकाऱ्याला वाटतं त्याच्या कर्ताकरवित्यांच्या मार्फत मला घाबरवता येईल आणि गप्प बसवता येईल.
पण तसं होणार नाही. नवाब मलिक कोणाला घाबरणार नाही. चोरांच्या विरोधात ही लढाई आम्ही सुरू केली आहे.
ती शेवटापर्यंत घेऊन जाणार. चोरांनी मला ललकारलं आहे, त्याला सडेतोड उत्तर मिळणार, असं ते म्हणाले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

दरम्यान, ‘भाजपच्या मार्फत जी काही चर्चा घडवून आणली जात आहे, त्याला काहीही आधार नाही.
आम्ही स्वत: ‘क्लीन अप’ मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम सुरूच राहायला हवी असं माझं मत आहे.
महाराष्ट्रात मंदिर, मशीद आणि दरग्याहच्या जमिनी ज्यांनी कोणी हडपल्या आहेत, त्या चव्हाट्यावर येतील, असं नवाब मलिक (Nawab Malik) यांनी म्हटलं आहे.

Web Title : Nawab Malik | former bjp minister grab temple land claims ncp minister nawab malik

हे देखील वाचा :

ST Workers Strike | ‘अनिल परब तुम्ही 6 व्या मजल्यावरुन उतरला नाहीत, पण महाराष्ट्राच्या मनातून उतरलात’ – मनसेचा हल्लाबोल

Anna Hazare | अण्णा हजारेंनी ST कामगारांना दिला ‘हा’ सल्ला; म्हणाले…

Pune Crime | फसवणूक प्रकरण ! एम. जी. एन्टप्रायजेसच्या अलनेश सोमजीची येरवडा कारागृहात रवानगी; पत्नी डिंपल सोमजीच्या जामीनावर सोमवारी सुनावणी

Related Posts