IMPIMP

Nawab Malik | देवेंद्र फडणवीसांनी राजकारणाचे गुन्हेगारीकरण केल्याचा नवाब मलिकांचा आरोप; म्हणाले – ‘देवेंद्रजी, दाऊद गँगचा रियाझ भाटी तुमच्या डिनर टेबलवर कसा दिसायचा’

by nagesh
Nawab Malik | NCP leader nawab malik ed case these ministers were given additional charge and other responsibility

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –   शरद पवार (Sharad Pawar) यांचा दाऊदशी (Dawood) संबंध असल्याचा आरोप करुन भाजपचे नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांनी संपूर्ण राज्यात एकेकाळी खळबळ उडवून दिली होती. त्याच गोपीनाथ मुंडे यांच्या आर्शिवादाने प्रथम भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि नंतर मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी फडणवीस यांचा दाऊद गँगसोबत संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित असलेल्या व्यक्तीं सरकारी पदांवर वर्णी लावण्यात आली. फडणवीसांच्या काळात गुन्हेगारांना संरक्षण देण्यात आले. राजकारणाचे गुन्हेगारीकरण करण्याचे काम फडणवीसांनी केले, असे गंभीर आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केले आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी संपूर्ण राज्यभर यात्रा काढून शरद पवार यांचे दाऊदशी संबंध आहेत. त्यांनी राजकारणाचे गुन्हेगारीकरण केल्याचे आरोप करुन राळ उडवून दिली होती. मलिक यांनी पत्रकार परिषदेत अनेक प्रश्न उपस्थित केले. रियाझ भाटी (riyaz bhati) कोण आहे ?. २९ ऑक्टोबरला तो बनावट पासपोर्टमुळे (Passport) सहार विमानतळावर (sahar airport) पकडला गेला. दाऊद इब्राहिम (dawood ibrahim) गँगसोबत त्याचे संबंध असल्याच्या बातम्या आल्या. दोन पासपोर्ट सोबत पकडला जाऊनही तो दोन दिवसात सुटला. तो भाजपाच्या तुमच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये का दिसत होता. तुमच्या डिनर टेबलवर का दिसत होता. पंतप्रधान आले असताना रियाझ भाटीने त्यांच्यासोबतही फोटो काढले. तुमच्या आशीर्वादाने हा सगळा खेळ चालत होता, असा गंभीर आरोपी मलिकांनी (Nawab Malik) केला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या प्रकरणाचा तपास भरकटविण्याचा प्रयत्न करीत आहेत. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि फडणवीस यांचे जुने संबंध आहेत. एक अधिकारी २००८ मध्ये नोकरीवर येतो आणि १४ वर्षात मुंबईबाहेर जात नाही, यामागचे कारण काय असा प्रश्न मलिक (Nawab Malik) यांनी उपस्थित केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

राजकारणाचे गुन्हेगारीकरण करण्याचे काम फडणवीस यांनी केले असा अतिशय गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे. मुन्ना यादव (Munna Yadhav) नागपूरातील कुख्यात गुंड आहे. त्याच्यावर हत्येसह अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याला बांधकाम कामगार बोर्डाचे अध्यक्षपद देण्यात आले.

हैदर आझम बांगला देशी लोकांना मुंबईत वसवण्याचे काम करतो की नाही ? त्याची दुसरी पत्नी बांगला देशी आहे की नाही ?,
मालाड पोलीस ठाण्याने या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. बंगाल पोलिसांनी त्याची कागदपत्रे बनावट कागदपत्रे ठरविली आहे.
तेव्हा मुख्यमंत्री कार्यालयातून फोन करुन तुम्ही हे प्रकरण दाबलं की नाही ?
त्याच हैदर आझमची तुम्ही मौलाना आझाद फायनान्स महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली की नाही ?, अशी प्रश्नांची मालिका मलिक (Nawab Malik) यांनी उपस्थित केली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title : Nawab Malik | Nawab Malik accuses Devendra Fadnavis of criminalizing politics; Said – ‘Devendraji, how did Dawood Gang’s Riaz Bhati look on your dinner table’

हे देखील वाचा :

Income Tax Returns | आर्थिक वर्ष 2020-21 साठी 2.38 कोटीपेक्षा जास्त IT रिटर्न दाखल – प्राप्तीकर विभाग

Pune Crime | पुण्यात हप्ता वसुली ! विमानतळ पोलिसांकडून गुंडावर मोठी कारवाई

Pune Crime | बारामतीत पिळदार शरीरयष्टीसाठी इंजेक्शन विकणारा ‘गोत्यात’

Related Posts